"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:51 IST2025-05-15T13:32:08+5:302025-05-15T13:51:51+5:30

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलेमानखिल यांनी भारताचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर आरोप केले.

The people of Afghanistan are wholeheartedly with India Maryam Soleimanakhil comments on relations with Pakistan | "अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले

"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले

मागील काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. या तणावावरुन जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानच्या संसद सदस्य मरियम सोलेमानखिल यांचे विधान समोर आले आहे. 'एएनआय' या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दलही भाष्य केले. मरियम  सोलेमानखिल यांनी पाकिस्तानवर अनेक आरोप केले आणि भारत नेहमीच अफगाणिस्तानचा खरा मित्र राहिला आहे असे म्हटले.

मरियम  सोलेमानखिल म्हणाल्या की 'पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणाव सुरू होता आम्ही अफगाणिस्तानची एकता पाहिली आहे.' अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत उभे आहेत.' 

तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...

मरियम सोलेमानखिल या निर्वासित अफगाणिस्तान संसदेच्या सदस्य आहेत. त्यांचा जन्म १९८४ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. २०१७ मध्ये, त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, लॉस एंजेलिसमधून मीडिया स्टडीजमध्ये बीएस पदवी मिळवली. याशिवाय, अफगाणिस्तानात जाण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेत ब्युटीशियन म्हणूनही काम केले आहे. सोलेमानाखिल यांना तालिबानचा विरोधक म्हणूनही ओळखले जाते.

मरियम सोलेमानखिल यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना मदत केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, संघर्षाच्या काळात अफगाणिस्तानातील जनता भारतासोबत उभी राहिली आहे. मला वाटते की भारत नेहमीच अफगाणिस्तानचा खरा मित्र राहिला आहे. 'मला वाटतं जेव्हा जेव्हा पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्ध झालं तेव्हा आम्ही अफगाणिस्तानची एकता पाहिली. अफगाणिस्तानने म्हटले की आम्ही भारतासोबत उभे आहोत. आम्हाला खोटेपणा समजतो, आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहणार नाही, असंही त्यांनी सांगितले. 

'भारताने जे केले ते आवश्यक होते'

भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर मरियम सोलेमानखिल म्हणाल्या की, भारताने जे काही केले ते आवश्यक होते. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. त्यांनी काश्मीरमध्ये घुसून निष्पाप लोकांना मारले. भारताने जे केले ते खूप जबाबदारीने केले. ते दहशतवादी चौक्या, दहशतवादी छावण्या आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आणखी वाढण्यास मदत करणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करत आहेत.

Web Title: The people of Afghanistan are wholeheartedly with India Maryam Soleimanakhil comments on relations with Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.