ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 20:16 IST2025-09-09T20:15:19+5:302025-09-09T20:16:37+5:30
राजधानी काठमांडू आणि जवळपासच्या भागांत झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.

ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये कथित भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. या निदर्शनादरम्यान निदर्शकांना दिसताच गोळी झाडण्याचा आदेश देणाऱ्या डीएसपीला निदर्शकांनी बेदम मारहाण करत ठार मारल्याचे वृत्त आहे. संबंधित डीएसपीनेच गोळीबाराचे आदेश दिले होते, ज्यात १९ जणांचा मृत्यू झाला, असे निदर्शकांचे म्हणणे आहे. निदर्शकांच्या मृत्युनंतर नेपाळमधील परिस्थिती आणखीनच बिघडली.
हिंसक निदर्शनात मोठे नुकसान -
देशभरात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. राजधानी काठमांडू आणि जवळपासच्या भागांत झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. निदर्शकांनी संसद भवनालाही आग लावली. यानंतर, पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानांवरही निदर्शकांनी हल्ला केला आणि तोडफोड करत ते जाळून टाकले.
माजी पंतप्रधान झालानाथ खनल यांच्या घरावर हल्ला, पत्नीचा मृत्यू -
निदर्शकांनी नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या यांच्या घरावरही हल्ला केला. हल्लेखोरांनी घराची तोडफोड केली आणि घराला आगही लावली. यावेळी खनाल यांची पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार घरातच होत्या. त्या गंभीर रित्या भाजल्या. त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यलक्ष्मी चित्रकार प्रचंड भाजल्या होत्या.