शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ड्रगनची नवी चाल! लडाखमध्ये चीन सीमेवर आता चिनी सैनिकांनी उभारले तंबू? नागरिकांच्या वेशात सैनिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 06:26 IST

लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती.

ठळक मुद्देदमचोकमध्ये तंबू उभारलेले चिनी नागरिक तेथेच राहतील ही शंका आहे लष्करी सूत्रांनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने चिनी नागरिकांनी दमचोकमध्ये घुसखोरी केलीतंबू उभे करणाऱ्यांत चिनी नागरिकांशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नागरिकांच्या वेषांत होते.

सुरेश एस. डुग्गरजम्मू : देश कारगिल विजयाचा २२वा दिन सोमवारी साजरा करीत असताना लडाखच्या दमचोक भागात अनेक ठिकाणी कथित चिनी नागरिकांनी तंबू उभे केले आहेत. भारताने त्यांना इशारा देऊनही काही फरक पडलेला नाही.

लडाख आघाडीवर दोन्ही देशांच्या सैन्य माघारीसाठी चर्चेची बारावी फेरी सोमवारी होणार होती. परंतु, कारगिल विजय दिवस कार्यक्रमामुळे भारतीय लष्कराच्या आग्रहानंतर ती पुढे ढकलली आहे. तोपर्यंत ही शंका आहे की, दमचोकमध्ये तंबू उभारलेले चिनी नागरिक तेथेच राहतील. लष्करी सूत्रांनुसार काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने चिनी नागरिकांनी दमचोकमध्ये घुसखोरी केली आहे. चीनचे लष्कर त्याला घुसखोरी समजत नाही. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांमध्ये जे १० वादग्रस्त भाग आहेत त्यात दमचोक एक आहे. त्यामुळे हे तंबू काढून टाकण्याची सक्तीने कारवाई केली जाऊ शकत नाही. 

नागरिकांच्या वेशात सैनिक...अधिकारी दावा करत होते की, तंबू उभे करणाऱ्यांत चिनी नागरिकांशिवाय पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नागरिकांच्या वेषांत होते.मिळालेल्या माहितीनुसार याबाबत हाॅटलाइनवर दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. परंतु, भारतीय लष्कर सध्या या भागात जाऊ शकत नाही कारण वादग्रस्त क्षेत्रांत गेल्या एक वर्षापासून भारतीय लष्करावर लावलेला ‘प्रतिबंध’ अजूनही कायम आहे. अंदाजे दहा असे वादग्रस्त क्षेत्र आधीपासूनच होते आणि गेल्या वर्षी चीनच्या लष्कराने लडाख आघाडीवर अनेक किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी करून असे आणखी अर्धा डझनच्या जवळपास भाग वादग्रस्त जाहीर केले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख