अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी केली जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:38 IST2026-01-15T20:16:52+5:302026-01-15T20:38:45+5:30
इराणमधील बिघडत्या परिस्थितीमुळे, देशाने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचा परिणाम एअर इंडिया आणि इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर झाला आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोघांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उड्डाणांना विलंब किंवा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी केली जारी
मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव सुरू आहे. इराणमधील बिघडत्या परिस्थितीचा हवाई प्रवासावरही परिणाम होत आहे. इराणने सर्व प्रवाशांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. दरम्यान, एअर इंडिया आणि इंडिगोसह अनेक प्रमुख विमान कंपन्यांनी सूचना जारी केल्या आहेत.
इराणी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, त्या मार्गावरील बहुतेक उड्डाणांना पर्यायी मार्गांनी प्रवास करावा लागत आहे, यामुळे विलंब होण्याची शक्यता आहे. काही उड्डाणे रद्दही करण्यात आली आहेत, असे विमान कंपन्यांनी सांगितले आहे.
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
एअर इंडियाने सूचना जारी केली
एअर इंडियाने प्रवाशांसाठी सूचना जारी केली आहे,"इराणमधील बदलत्या परिस्थितीमुळे, हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. एअर इंडियाची उड्डाणे पर्यायी मार्गांनी चालत आहेत, यामुळे विलंब होऊ शकतो.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, काही उड्डाणे मार्ग बदलू शकत नाहीत, यामुळे काही विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे.
इंडिगोने प्रवाशांसाठी प्रवास निवेदन प्रसिद्ध केले आहे. इराणी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीवर विमान कंपन्यांचे कोणतेही नियंत्रण नाही आणि म्हणूनच, प्रवाशांना झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत,यामध्ये असे म्हटले आहे.
इराणमध्ये हजारो लोकांचा मृत्यू
इराणमधील हिंसाचार सुरू आहे. बहुतेक इराणी प्रांत आगीत जळून खाक झाले आहेत. हिंसक निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी खामोनी सरकारने कठोर भूमिका स्वीकारली आहे. इराणमध्ये आतापर्यंत ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे.