शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

पंतप्रधान मोदीचं 'ते' वक्तव्य तालिबानला चांगलंच झोंबलं; अशी आली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 22:53 IST

दहशतवादाची सत्ता फार काळ टिकत नसते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य तालिबानला चांगलेच झोंबले आहे. तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन ...

दहशतवादाची सत्ता फार काळ टिकत नसते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य तालिबानला चांगलेच झोंबले आहे. तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन दिलावरने मोदींचे हे वक्तव्य आव्हान म्हणून स्वीकारत, त्याची संघटना यशस्वी होईल, असा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिलावर म्हणाला, की तालिबान चांगल्या प्रकारे देश चालवू शकतो, हे भारताला लवकरच दिसेल. मोदींनी सोमनाथ मंदिराशी संबंधित अनेक विकास कामांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमादरम्यान तालिबानचा उल्लेख न करता हे वक्तव्य केले होते. (Taliban Shahabuddin Delawar reaction on pm Narendra Modi empire of terror comment)

पंतप्रधान मोदी म्हणाले होते, 'भगवान सोमनाथांचे मंदिर आज केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक विश्वासाचे केंद्र आहे. ज्या विध्वंसक शक्ती आहेत... दहशतीच्या बळावर सामर्थ्य निर्माण करणारा जो विचार आहे... तो एखाद्या कालखंडात भलेही बरचढ ठरो, मात्र, त्याचे अस्तित्व फार काळ नसते. तो फार काळ मानवतेला दाबू शकत नाही. पंतप्रधानांच्या या वक्तव्याकडे अफगाणिस्तानातील परिस्थितीला जोडून पाहिले गेले.

Kabul Airport : काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार, 100 अफगाण नागरिकांना घेऊन केलं होतं उड्डाण

तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन दिलावरने 'रेडियो पाकिस्तान'ला दिलेल्या एका मुलाखतीत, अफगानिस्तानच्या अतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नका, असा इशाराही भारताला दिला आहे. याच बरोबर, त्याने पाकिस्तानला मित्र राष्ट्र म्हणत, 30 लाखहून अधिक अफगाण नागरिकांना शरण दिल्याबद्दल आभारही मानले आहेत. याशिवाय सर्वच देशांसोबत शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, अशी तालिबानची इच्छा असल्याचेही त्याने म्हटले आहे.

Kabul Airport Explosion: काबुल विमानतळाबाहेर सलग दोनबॉम्ब स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

काबुल विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट -अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्ब स्फोट झाले आहेत. अमेरिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटांत आतापर्यंत 15 जणांच्या मृत्यूची झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यामागे ISIS या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :TalibanतालिबानNarendra Modiनरेंद्र मोदीAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद