Kabul Airport : काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार, 100 अफगाण नागरिकांना घेऊन केलं होतं उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 09:34 PM2021-08-26T21:34:40+5:302021-08-26T21:34:54+5:30

याच विमानाने प्रवास करणाऱ्या एका इटालियन पत्रकाराने स्काय-24 टीजीला दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सुमारे 100 अफगाण नागरिकांना घेऊन जात होते.

Afghanistan shots fired at an italian military transport plane flew out of kabul airport | Kabul Airport : काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार, 100 अफगाण नागरिकांना घेऊन केलं होतं उड्डाण

Kabul Airport : काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार, 100 अफगाण नागरिकांना घेऊन केलं होतं उड्डाण

Next

काबुल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये विमानतळावरून उड्डाण करताच इटालियन लष्कराच्या परिवहन विमानावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. इटलीच्या संरक्षण मंत्रालयाने एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली. या घटनेत विमानाचे कसल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचेही सूत्राने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेसह अनेक देशांनी काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला असताना आणि त्यांच्या नागरिकांना येथून दूर राहण्यास सांगितले असतानाच ही घटना घडली आहे. (Afghanistan shots fired at an italian military transport plane flew out of kabul airport)

याच विमानाने प्रवास करणाऱ्या एका इटालियन पत्रकाराने स्काय-24 टीजीला दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सुमारे 100 अफगाण नागरिकांना घेऊन जात होते. मात्र, उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामागे कुणाचा हात आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. काबुल विमानतळावर इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यासंदर्भातही इशारा देण्यात आला आहे.

Kabul Airport Explosion: काबुल विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्ब स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर अमेरिका आणि इटलीसह अनेक देश आपल्या आणि तेथील नागरिकांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत. यासाठी लष्कराची विमानेही वापरली जात आहेत. भारतही आपल्या नागरिकां शिवाय, तेथील हिंदू आणि शीख नागरिकांनाही बाहेर काढण्यात गुंतलेला आहे. भारताने या मोहिमेला 'देवी शक्ती' असे नाव दिले आहे.

काबुल विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट -
अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्ब स्फोट झाले आहेत. अमेरिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटांत आतापर्यंत 15 जणांच्या मृत्यूची झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यामागे ISIS या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: Afghanistan shots fired at an italian military transport plane flew out of kabul airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.