तालिबानी तरूणांनी 'गे' तरूणावर केला रेप, विरोध केल्यावर दिली 'ही' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:13 IST2021-09-01T19:08:55+5:302021-09-01T19:13:33+5:30

जेव्हापासून अमेरिकन सेनेची घरवापसी झाली आहे त्या दिवसापासून अफगाणिस्तानातील महिला भीतीच्या वातावरण आहेत.

Taliban fighter beat and rape gay men in Afghanistan know what happens | तालिबानी तरूणांनी 'गे' तरूणावर केला रेप, विरोध केल्यावर दिली 'ही' शिक्षा

तालिबानी तरूणांनी 'गे' तरूणावर केला रेप, विरोध केल्यावर दिली 'ही' शिक्षा

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पंजशीर सोडून संपूर्ण अफगाणिस्तानवरतालिबान या संघटनेने ताबा मिळवला आहे. दररोज तालिबानचा क्रूर चेहरा समोर येत आहे. महिलांसाठी आणि पुरूषांसाठी दररोज नवनवे फतवे निघत आहेत. ताजी धक्कादायक घटना तालिबानचा अमानवीय चेहरा दाखवणारी आहे. इथे समलैंगिक तरूणासोबत अमानवीय कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

जेव्हापासून अमेरिकन सेनेची घरवापसी झाली आहे त्या दिवसापासून अफगाणिस्तानातील महिला भीतीच्या वातावरण आहेत. तालिबानच्या अत्याचारामुळे एलजीबीटीक्यू समुदायही घाबरलेला आहे. डेली मेलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दोन तालिबानी तरूणांनी एका समलैंगिक तरूणासोबत रेप केला आणि त्याला मारहाण केली.

तालिबानी तरूणांना हा तरूण गे असल्याचं समजलं होतं. त्यांनंतर त्यांनी पीडित तरूणाला मैत्रीचं आमिष देत काबुलमध्ये सुरक्षित जागा देण्याचंही खोटं सांगितलं. तसेच त्याला देशातून बाहेर जाण्यासाठी एक सुरक्षित मार्ग दाखवण्याचंही सांगितलं होतं. त्याला भेटायला बोलवून ताबिलानी तरूणांनी त्या तरूणासोबत अनैसर्गिक संबंध टेवले आणि त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा नंबर घेतला. त्यांना फोन सांगितलं की, तुमचा मुलगा गे आहे.
 

Web Title: Taliban fighter beat and rape gay men in Afghanistan know what happens