स्वीत्झर्लंडमध्ये जगातील सर्वात महागडी शाळा

By Admin | Updated: June 9, 2015 23:59 IST2015-06-09T23:59:18+5:302015-06-09T23:59:18+5:30

स्वीत्झर्लंडमध्ये इन्स्टिट्यूट आॅफ ले रोजे ही आंतरराष्ट्रीय निवासी शाळा असून, ही शाळा जगात सर्वाधिक महागडी समजली जाते.

Switzerland's most expensive school in the world | स्वीत्झर्लंडमध्ये जगातील सर्वात महागडी शाळा

स्वीत्झर्लंडमध्ये जगातील सर्वात महागडी शाळा

झुरीच : स्वीत्झर्लंडमध्ये इन्स्टिट्यूट आॅफ ले रोजे ही आंतरराष्ट्रीय निवासी शाळा असून, ही शाळा जगात सर्वाधिक महागडी समजली जाते. या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च १ कोटी ३५ लाख रुपयापेक्षा जास्त आहे. यात शैक्षणिक फी तर आहेच पण त्याचबरोबर निवास खाणे, पिणे व इतर खर्च असतो.
या शाळेची स्थापना १८८० मध्ये पॉल अ‍ॅमिली कार्नेल यांनी केली होती. या शाळेत दर ५ विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असतो. सर्व विद्यार्थी बोर्डींग हाऊसमध्ये राहतात. येथील अभ्यासक्रम फ्रेंच व इंग्रजी भाषात आहे. वेगवेगळ्या खेळांसाठी मैदान व साहित्य उपलब्ध असून विविध खेळ शिकविण्यासाठी प्रशिक्षकही आहेत. येथे पहिल्या टर्ममध्ये घोडदौड व बॅडमिंटन, दुसऱ्या टर्ममध्ये स्कीर्इंग , तिसऱ्या टर्ममध्ये नृत्य व टेनिस क्लासेस घेतले जातात.
राजघराण्यातील मुले, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी व धनाढ्य लोकांची मुले या शाळेत शिकतात. या शाळेत एकाचवेळी ४०० मुले शिकतात.
या शाळेचा आणखी एक कॅम्पस असून हिवाळ्यात मुले तिथे शिफ्ट केली जातात. ही सुंदर शाळा हिल रिसॉर्टप्रमाणे आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Switzerland's most expensive school in the world