काळ्या पैशासाठी स्वीस बँका हे आकर्षक ठिकाण

By Admin | Updated: June 21, 2015 23:58 IST2015-06-21T23:58:05+5:302015-06-21T23:58:05+5:30

स्वीत्झर्लंड हा देश परदेशातील मनी लाँड्रिंगद्वारा जमा केलेली रक्कम ठेवण्यासाठी जगातील सर्वाधिक आकर्षक जागा बनला असल्याची कबुली

Swiss banks are an attractive place for black money | काळ्या पैशासाठी स्वीस बँका हे आकर्षक ठिकाण

काळ्या पैशासाठी स्वीस बँका हे आकर्षक ठिकाण

बर्न : स्वीत्झर्लंड हा देश परदेशातील मनी लाँड्रिंगद्वारा जमा केलेली रक्कम ठेवण्यासाठी जगातील सर्वाधिक आकर्षक जागा बनला असल्याची कबुली स्वीत्झर्लंडने प्रथमच दिली आहे. मनी लाँड्रिंग व दहशतवादी कारवायांना आर्थिक मदतीचा मुकाबला करण्यासाठी आपली व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असल्याचेही स्वीत्झर्लंडने मान्य केले आहे.
भारत व इतर देशांनी स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्या नागरिकांची माहिती देण्यासाठी दबाव आणल्यानंतर स्वीत्झर्लंडने ही कबुली दिली आहे. अवैध पैसा जमा करणाऱ्या नागरिकांनी आपले धन सुरक्षित ठेवण्यासाठी स्वीस बँकांच्या गोपनीयता बाळगण्याच्या नियमाचा फायदा घेतला आहे.
स्वीत्झर्लंडच्या एका उच्चस्तरीय सरकारी समितीने आपला देशही आर्थिक गुन्ह्यापासून वाचलेला नाही, असे म्हटले असून आर्थिक गुन्ह्याचा सर्वाधिक धोका येथील बँकांना आहे, असे म्हटले आहे. आर्थिक गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा देशातील बँकांत येऊ शकतो, असे या समितीने म्हटले आहे; पण कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही.
स्वीस बँकांनी अमेरिका व अन्य काही देशांच्या सरकारांशी अशा प्रकरणांचा निपटारा केला आहे. या देशांच्या नागरिकांनी देशात करचोरी करून पैसा स्वीस बँकांत ठेवला होता. परदेशी नागरिकांचा अवैध पैसा ठेवण्याचे आकर्षक स्थळ अशी आपल्या देशाची प्रसिद्धी झाली आहे, अशी कबुली स्वीत्झर्लंडने प्रथमच दिली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Swiss banks are an attractive place for black money