शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशाला गवसणी घालणाऱ्या सुनीता विल्यम्स NASAमधून निवृत्त, आता एवढी मिळणार पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:21 IST

Sunita Williams Retired: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामधील प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. भारतीय वंशाच्या अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून लागू झाली आहे.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामधील प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. भारतीय वंशाच्या अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून लागू झाली आहे. सुनीता विल्यम यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर तीन मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले.

सुनीता विल्यम्स यांच्या यशस्वी कारकीर्दीबाबत नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स यांनी एकूण ६०८ दिवस अंतराळात वास्तव्य केले आहे. नासाच्या कुठल्याही अंतराळवीराने अंतराळात वास्तव्य केलेला हा दुसरा सर्वाधिक कालावधी आहे. याशिवाय सुनिता विल्यम्स यांनी एकूण ९ वेळा स्पेसवॉक केला आहे. त्याचा एकूण कालावधी ६२ तास ६ मिनिटे एवढा आहे. कुठल्याही महिला अंतराळवीराने स्पेसवॉकमध्ये केलेला हा सर्वाधिक कालावधी आहे. तर एकूण स्पेसवॉकच्या यादीत सुनीता विल्यम्स चौथ्या क्रमांकावर आहेत.

नासाचे प्रशासक जेरेड आयझेकमेन यांनी सांगितले की, सुनीता विल्यम्स मानव अंतराळ उड्डाणामध्ये अग्रेसर राहिल्या. तसेच त्यांनी अंतराळ स्थानकामध्ये आपल्या नेतृत्वामधून भविष्यातील मोहिमांची पायाभरणी केली. त्यांच्या योगदानामुळे चंद्रासाठी आर्टेमिस मोहीम आणि भविष्यातील मंगळ ग्रहांकडे आगेकूच करण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

निवृत्त होण्यापूर्वी सुनीता विल्यम्स या नासाचा सर्वात वरिष्ठ वेतनश्रेणी स्तर असलेल्या जीएस-१५ मध्ये कार्यरत होत्या. या स्तरावर असताना त्यांना दरवर्षी सुमारे १ कोटी २० लाख ते १ कोटी ३० लाख रुपये एवढं वेतन मिळत असे. याशिवाय मोहिमेचे भत्ते, संशोधनाची सुविधा आणि इतर सरकारी लाभही मिळत होते. आता निवृत्त झाल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना नासाच्या फेडरल एम्प्लॉईज रिटायरमेंट सिस्टिम अंतर्गत पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन त्यांचा एकूण सेवा कालावधी आणि सरासरी वेतनाच्या आधारावर निश्चित केली जाईल. त्याशिवाय त्यांना अमेरिकेच्या सोशल सिक्युरिटी स्कीमचा फायदाही मिळणार आहे. त्यामधून त्यांना दरमहा एक निश्चित वेतन मिळत राहील.  

सुनीता विल्यम्स या पहिल्यांदा डिसेंबर २००६ मध्ये अंतराळात गेल्या. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा अंतराळाकडे उड्डाण केलं होतं. तर २०२४ मध्ये त्या बोईल स्टारलायनर मोहिमेच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स या अंतराळात गेल्या होत्या. या मोहिमेवेळी काही तांत्रिक अडथळ्यांमुळे त्यांचं अंतराळातील वास्तव्य वाढलं होतं. अखेरीस २०२५ मध्ये त्या पृथ्वीवर परतल्या होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunita Williams, NASA Astronaut, Retires After Record Space Stay

Web Summary : After 27 years, NASA astronaut Sunita Williams retires, effective December 2025. She holds records for spaceflight duration and spacewalks by a woman. Her work has paved the way for future missions to the Moon and Mars.
टॅग्स :Sunita Williamsसुनीता विल्यम्सNASAनासाUnited StatesअमेरिकाIndiaभारत