लष्कराच्या बसवर आत्मघातकी हल्ला, ४० जवान ठार

By Admin | Updated: June 30, 2016 21:09 IST2016-06-30T21:09:31+5:302016-06-30T21:09:31+5:30

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज लष्करात नव्याने भरती झालेल्या जवानांना घेऊन जात असलेल्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत

A suicide attack on the military bus, 40 soldiers killed | लष्कराच्या बसवर आत्मघातकी हल्ला, ४० जवान ठार

लष्कराच्या बसवर आत्मघातकी हल्ला, ४० जवान ठार

>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. ३० : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज लष्करात नव्याने भरती झालेल्या जवानांना घेऊन जात असलेल्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबूल शहराजवळ हा हल्ला झाला असून, बसमध्ये नव्याने लष्करात भरती झालेले तरुण होते. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लष्करी शिक्षणाचा पदवीप्रदान सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर हे जवान परतत असताना हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ४० जण ठार झाले असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. लष्कराच्या अन्य एका वाहनावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

Web Title: A suicide attack on the military bus, 40 soldiers killed