कडक कायदा! सौदीच्या राजपुत्राला मारले फटके

By Admin | Updated: November 2, 2016 17:09 IST2016-11-02T17:08:45+5:302016-11-02T17:09:28+5:30

हत्येच्या आरोपाखाली सौदी अरेबियाच्या एका राजपुत्राला मृत्युदंड देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सौदी अरेबियाच्या अजून एका राजपुत्राला शिक्षा देण्यात आली आहे.

Strict law! The Saudi prince was killed | कडक कायदा! सौदीच्या राजपुत्राला मारले फटके

कडक कायदा! सौदीच्या राजपुत्राला मारले फटके

> ऑनलाइन लोकमत
दुबई, 2 - हत्येच्या आरोपाखाली सौदी अरेबियाच्या एका राजपुत्राला मृत्युदंड देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सौदी अरेबियाच्या अजून एका राजपुत्राला शिक्षा देण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या राजपुत्राला सुनावण्यात आलेल्या शिक्षेनुसार जेद्दा येथील तुरुंगामध्ये चाबकाचे फटके मारण्यात आले.  
राजपुत्राला देण्यात आलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे वृत्त आज सौदी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे. मात्र ओकाझ डेली या वृत्तपत्रात आलेल्या वृत्तात राजपुत्राला कोणत्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा सुनावण्यात आली याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मात्र राजपुत्राला तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
 गेल्याच महिन्यात सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील राजपुत्र तुर्की बिन सौद अल-कबीर याला मित्राची हत्या केल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड देण्यात आला होता.
(हत्येप्रकरणी सौदीच्या राजपुत्राला मृत्युदंड) 

Web Title: Strict law! The Saudi prince was killed