जगभरात शिया मुस्लिमांची संख्या किती? भारतात किती राहतात? पाहा यादी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:36 IST2026-03-02T18:34:35+5:302026-03-02T18:36:06+5:30
Shia Muslims In World: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर शिया-सुन्नी चर्चेत!

जगभरात शिया मुस्लिमांची संख्या किती? भारतात किती राहतात? पाहा यादी...
Shia Muslims In World: मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिया आणि सुन्नी मुस्लिम समुदायांबाबतची चर्चा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर तीव्र झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षानंतर हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जगभरात शिया मुसलमानांची संख्या किती आहे आणि कोणत्या देशांमध्ये त्यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. या यादीत भारताचाही समावेश असल्याने, भारतासह जागतिक स्तरावर शिया समुदायाची स्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरत आहे.
शिया मुसलमानांची एकूण लोकसंख्या
विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास व अंदाजानुसार, जगभरात शिया मुसलमानांची संख्या सुमारे 20 ते 26 कोटीं दरम्यान आहे. ही संख्या जागतिक मुस्लिम लोकसंख्येच्या अंदाजे 10 ते 13 टक्के इतकी आहे. म्हणजेच, जगातील प्रत्येक 100 मुसलमानांपैकी सुमारे 10 ते 13 जण शिया आहेत, तर उर्वरित बहुसंख्य मुसलमान सुन्नी पंथाचे आहेत. शिया समुदाय अनेक देशांत विखुरलेला असला, तरी काही देशांमध्ये त्यांची लोकसंख्या विशेषतः मोठ्या प्रमाणात आहे.
शिया मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश
शिया लोकसंख्येच्या बाबतीत इराण जगात अव्वल आहे. येथे शिया लोकसंख्या 8 ते 8.5 कोटी असून, देशाच्या एकूण लोकसंख्येतील वाटा 90 ते 95% आहे.
भारत
इराणनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची शिया लोकसंख्या भारतात असल्याचे मानले जाते. भारतात शिया लोकसंख्या 3 ते 5 कोटी आहे. भारतातील मुस्लिम लोकसंख्येतील यांचा वाटा 10 ते 15% आहे. भारतात शिया समुदाय प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीर, हैदराबाद आणि इतर काही भागांत आढळतो. लखनऊ हे शहर दीर्घकाळापासून शिया संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
येथे शिया लोकसंख्या 2.5 ते 4.5 कोटी आहे. एकूण मुस्लिम लोकसंख्येतील वाटा 10 ते 20% आहे.
इराक
इराकमध्ये शिया मुसलमान बहुसंख्य आहेत. मुस्लिम लोकसंख्येतील शिया वाटा 65 ते 70% असून, एकूण संख्या 2 ते 2.5 कोटी आहे.
अझरबैजान
शिया लोकसंख्या 65 ते 75% असून, इराणनंतरचा हे एक प्रमुख शिया बहुसंख्य देश आहे.
बहरीन
येथे शिया लोकसंख्या 65 ते 75% आहे. मात्र, येथे सत्ताधारी व्यवस्था सुन्नी राजघराण्याच्या हाती आहे.
लेबनॉन
येथे शियांची लोकसंख्या 45 ते 55% असून, लेबनॉनमध्ये शिया समुदाय राजकीयदृष्ट्याही प्रभावी मानला जातो.
येमेन
येथे शिया लोकसंख्या 35 ते 45% आहे. येथील बहुतांश शिया जैदी पंथाचे आहेत.
अफगाणिस्तान
येथे शिया लोकसंख्या 10 ते 15% आहे.
तुर्की
येथे शिया लोकसंख्या 1 ते 2 कोटी असून, येथे मोठ्या प्रमाणात अलेवी समुदाय आढळतो.
इतर देश
जॉर्जिया: 15 ते 25%
बल्गेरिया: 10 ते 15%
स्वीडन: मुस्लिम लोकसंख्येपैकी 20 ते 40% शिया
शिया बहुसंख्य देश किती?
जगात केवळ चार देश असे आहेत जिथे शिया मुसलमान बहुसंख्य आहेत:
इराण
इराक
अझरबैजान
बहरीन
या देशांमध्ये शिया लोकसंख्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. इतर देशांमध्ये शिया समुदाय अल्पसंख्य स्वरूपात राहतो.