शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.  

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान  हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातील पहिले व्यक्ती पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले

सेऊल (दक्षिण कोरिया) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे जागातील 14 वे आणि भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.  दरम्यान, पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे.  ''सियोल शांती पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मात्र या  सन्मानाकडे मी केवळ वैयक्तिरित्या माझा माझा सन्मान म्हणून पाहत नाही तर भारतीय जनतेला कोरियाई जनतेने दिलेल्या सद्भावना आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहतो,'' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.

 सेऊल शांतता पुरस्कारासाठी जगभरातुन एकूण 1300 नामांकने प्राप्त झाली होती. त्यानंतर पुरस्कार कमिटीने त्यातील 100 नामांकनाबाबत गांभीर्याने विचार केला.  अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या आधी हा पुरस्कार जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी प्रमुख असलेल्या बान की मून यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.  

1) मोदीनॉमिक्स - नरेंद्र मोदी यांनी जनधनसारखी महत्त्वाची योजना सुरू केली होती. पुरस्कार समितीने गरीब आणि श्रीतमंत यांच्यातील अंतर कमी करण्यासाठीचे श्रेय हे मोदीनॉमिक्सला दिले. 2) भ्राष्टाचारावर लगाम - नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर देशात टीका झाली असली तरी पुरस्कार समितीने भ्रष्टाचार रोखण्यासाठीची आश्वासक पाऊले म्हणून या निर्णयांकडे पाहिले. 3) जागतिक सहकार्य - तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाची दखलही पुरस्कार समितीने घेतली.

सेऊल शांतता पुरस्कार काय आहे?  1988  मध्ये दक्षिण कोरियामध्ये 24 व्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. या ऑलिम्पिकमध्ये 160 देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर दक्षिण कोरियाने सेऊल शांतता पुरस्कार देण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSouth Koreaदक्षिण कोरिया