खळबळजनक! रशियन तरुणींशी संबंध आणि गुप्तरोगाचा संसर्ग? बिल गेट्स यांनी सोडले एप्स्टिन फाईलवर मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:53 IST2026-01-31T18:52:17+5:302026-01-31T18:53:08+5:30

Bill Gates Russian Girl Case STD : बिल गेट्स यांच्यावर रशियन तरुणींशी संबंध आणि गुप्तरोगाचे गंभीर आरोप झाले आहेत. जेफ्री एपस्टीनने ब्लॅकमेल केल्याच्या दाव्यावर गेट्स यांनी काय म्हटले? वाचा सविस्तर.

Sensational! Relationship with Russian girls and infection with a sexually transmitted disease? Bill Gates breaks his silence | खळबळजनक! रशियन तरुणींशी संबंध आणि गुप्तरोगाचा संसर्ग? बिल गेट्स यांनी सोडले एप्स्टिन फाईलवर मौन

खळबळजनक! रशियन तरुणींशी संबंध आणि गुप्तरोगाचा संसर्ग? बिल गेट्स यांनी सोडले एप्स्टिन फाईलवर मौन

न्यूयॉर्क: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स सध्या एका गंभीर वादामुळे चर्चेत आले आहेत. कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांनंतर आता गेट्स यांच्यावर रशियन तरुणींशी शारीरिक संबंध आणि त्यातून गुप्तरोगाची लागण झाल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावर आता खुद्द बिल गेट्स यांनी आपली बाजू मांडली आहे.

एपस्टीन फाईल्स आणि विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेफ्री एपस्टीनने बिल गेट्स यांना रशियन तरुणींच्या संपर्कात आणले होते. एका विशिष्ट रशियन तरुणीशी असलेल्या संबंधातून गेट्स यांना गुप्तरोगाची लागण झाली होती आणि एपस्टीनने याच माहितीचा वापर करून गेट्स यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असे दावे केले जात आहेत.

बिल गेट्स यांचे स्पष्टीकरण
या सर्व आरोपांवर भाष्य करताना बिल गेट्स यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. गेट्स यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "जेफ्री एपस्टीनने बिल गेट्स यांच्याशी केवळ परोपकारी कामांसाठी संपर्क साधला होता. मात्र, एपस्टीनने आपल्या फायद्यासाठी गेट्स यांना चुकीच्या पद्धतीने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला." गेट्स यांनी यापूर्वीच कबूल केले आहे की, एपस्टीनला भेटणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.

कौटुंबिक जीवनावर परिणाम
या वादग्रस्त प्रकरणाचा परिणाम बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या वैवाहिक जीवनावरही झाला होता. २०२१ मध्ये झालेल्या त्यांच्या घटस्फोटामागे एपस्टीनसोबतची मैत्री हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जाते. आता रशियन तरुणी आणि ब्लॅकमेलिंगच्या दाव्यांमुळे गेट्स यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

Web Title : बिल गेट्स ने एप्स्टीन फाइलों पर दी सफाई: रूसी संबंध, गुप्त रोग?

Web Summary : बिल गेट्स ने जेफरी एप्स्टीन से जुड़े रूसी संबंधों और गुप्त रोग के आरोपों का खंडन किया। उन्होंने माना कि एप्स्टीन से मिलना एक गलती थी, जिसका असर उनकी शादी पर पड़ा। गेट्स के प्रवक्ता ने कहा कि एप्स्टीन ने उनके परोपकारी संबंध का फायदा उठाने की कोशिश की।

Web Title : Bill Gates addresses Epstein files: Russian affairs, STD allegations?

Web Summary : Bill Gates denies allegations of Russian affairs and STD infection linked to Jeffrey Epstein. He admits meeting Epstein was a mistake, impacting his marriage. Gates' spokesperson stated Epstein tried to exploit their philanthropic connection.