शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सौदीचे राजपुत्र करणार ३२ अब्ज डॉलरचा दानधर्म!

By admin | Updated: July 2, 2015 02:53 IST

सौदी अरबस्तानचे अब्जाधीश राजपुत्र अलवालिद बिन तलाल यांनी त्यांच्या वाट्याची सर्व म्हणजे ३२ अब्ज डॉलरची संपती आगामी काळात धर्मादाय कामांसाठी खर्च

रियाध : सौदी अरबस्तानचे अब्जाधीश राजपुत्र अलवालिद बिन तलाल यांनी त्यांच्या वाट्याची सर्व म्हणजे ३२ अब्ज डॉलरची संपती आगामी काळात धर्मादाय कामांसाठी खर्च करण्याची घोषणा बुधवारी केली.‘किंगडम होल्डिंग’ या आपल्या कंपनीच्या मुख्यालयात ६६ व्या मजल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजपुत्र अलवालिद यांनी सांगितले की, अमेरिकेत दानधर्मासाठी स्थापन झालेल्या बिल व मेलिंडा गेट्स फौंडेशन आणि तत्सम अन्य संस्थांच्या धर्तीवर आपणही एक स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत भावी काळात मानव कल्याणाच्या विविध योजना राबवू.या ट्रस्टच्या प्रमुखपदी स्वत: राजपुत्र अलवालिद असतील व ट्रस्टमधील निधी कसा व केव्हा खर्च करायचा याचा निर्णय नियामक मंडळ घेईल. यासाठी प्रत्येक योजनेची काळजीपूर्वक आखणी केली जाईल, असे ते म्हणाले. मात्र पुढील किती वर्षांत हे पैसे खर्च केले जातील याची निश्चित कालमर्यादा त्यांनी दिली नाही. तरीही आपण हयात नसलो तरी या धर्मादाय निधीचा वापर इच्छित उद्दिष्टांसाठी सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या या दानधर्मामुळे ‘ सांस्कृतिक सलोख्यास मदत मिळेल, महिलांचे सबलीकरण होईल, युवापिढीला मदतीचा हात मिळेल, आपत्तीग्रस्तांचे अश्रु पुसले जातील आणि अधिक सहिष्णु व सामजस्यपूर्ण जग घडवायला हातभार लागेल‘, अशी आशा अलवालिद यांनी एका निवेदनात व्यक्त केली. मात्र दानधर्मासाठीच्या या निधीत ‘किंगडम होल्डिंग’च्या पैशाचा समावेश नाही, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)