शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

गलवान संघर्षानंतर एस जयशंकर पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंध स्थिर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:26 IST

S Jaishankar China Visit: गलवानमधील संघर्षानंतर भारत-चीन संबंध खालच्या पातळीवर पोहोचले होते. या घटनेचा केवळ सीमेवरच नाही, तर राजकीय आणि आर्थिक परिणाम झाला होता.

S Jaishankar China Visit: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षात जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. या दौऱ्याचा उद्देश भारत-चीन संबंध मजबूत करणे, तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बिघडलेले संबंध पुन्हा रुळावर आणणे आहे. जयशंकर मंगळवारी तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील आणि चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील.

२०२० ते २०२५ दरम्यान भारत-चीन संबंधांमध्ये विश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. सीमा वादावरील तणाव निश्चितच कमी झाला आहे, परंतु त्याचा खोलवर परिणाम अजूनही दिसून येत आहे. भारत-चीन संबंधांमध्ये एकेकाळी सहकार्य होते, मात्र आता सावधगिरी बाळगली जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला लष्करी पाठिंबा दिल्यामुळे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा चीन दौरा विशेष मानला जातोय. 

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भेटअसे नाही की या वर्षांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये प्रगती झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातही बैठक झाली आहे. रशियामध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत झालेल्या या बैठकीनंतर चीनने म्हटले होते की, ते दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेल्या सहमतीची अंमलबजावणी करण्यास तयार आहे. बैठकीत, पंतप्रधान मोदींनी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता राखून योग्य पद्धतीने मतभेद आणि वाद सोडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यांनी म्हटले होते की परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि संवेदनशीलता हे संबंधांचा आधार राहिले पाहिजेत. 

भारत-चीन संबंध स्थिर गेल्या काही वर्षांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये बरीच स्थिरता आली आहे. अशा वातावरणात, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची ही भेट दोन्ही देशांमधील अर्थपूर्ण संवादासाठी एक महत्त्वाची पावले ठरू शकते. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, चीन आणि भारत दोघेही वेगाने वाढत आहेत. 

गलवान नंतर परिस्थिती बदललीजून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध खालच्या पातळीवर पोहोचले होते. हा संघर्ष गेल्या काही दशकांमधील दोन्ही बाजूंमधील सर्वात गंभीर लष्करी संघर्ष होता. या संघर्षानंतर, भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील संघर्षाच्या इतर ठिकाणांहून सैन्य हटवण्यासह गस्त घालण्यास सुरुवात करण्याच्या करारावर सहमती दर्शविली होती. पूर्व लडाखमध्ये सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेल्या लष्करी तणावाचे निराकरण करण्यासाठी या कराराकडे एक मोठे यश म्हणून पाहिले जात होते. २००३ मध्ये दोन्ही देशांमधील विशेष प्रतिनिधी यंत्रणा स्थापन झाली. तेव्हापासून दोन्ही बाजूंमध्ये २० वेळा चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीन