रशियाचा मास्टरस्ट्रोक! तालिबान सरकारला अधिकृत मान्यता, पाकिस्तानसह अमेरिकेची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:32 IST2025-07-04T12:31:44+5:302025-07-04T12:32:25+5:30

Russia Recognize Taliban Government: यामुळे अमेरिकेच्या प्रादेशिक प्रभावाला आव्हान मिळेलच, शिवाय पाकिस्तानलाही गंभीर धोरणात्मक आव्हानांना तोंड द्यावे लागेल.

Russia's masterstroke! Official Recognizes Taliban Government: Pakistan and US in tense | रशियाचा मास्टरस्ट्रोक! तालिबान सरकारला अधिकृत मान्यता, पाकिस्तानसह अमेरिकेची डोकेदुखी वाढणार

रशियाचा मास्टरस्ट्रोक! तालिबान सरकारला अधिकृत मान्यता, पाकिस्तानसह अमेरिकेची डोकेदुखी वाढणार

Russia Recognize Taliban Government: भारताचा जवळचा मित्र रशियाने घेतलेल्या एका निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने गुरुवारी (३ जुलै २०२५) सांगितले की, रशिया त्यांच्या राजवटीला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. यासह तालिबानला मान्यता देमारा रशिया पहिला देश बनला आहे. चीन आणि पाकिस्तानसह इतर अनेक देशांच्या राजधान्यांमध्ये तालिबानचे राजदूत आहेत, परंतु त्यांनी या देशाला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि अफगाणिस्तानातील रशियाचे राजदूत दिमित्री झिरनोव्ह यांच्यात काबूलमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. मुत्ताकी यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, हा धाडसी निर्णय इतरांसाठी एक उदाहरण असेल. आता आम्हाला मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, रशिया पहिला देश ठरला आहे.

पुतिन यांचा मास्टर स्ट्रोक
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान, ट्रम्प यांनी स्वतःला तटस्थ दाखवण्यासाठी भारताला उघडपणे पाठिंबा दिला नव्हता. अशा परिस्थितीत, पुतिन यांच्या या निर्णयाला मास्टर स्ट्रोक मानले जात आहे. यामुळे अमेरिकेच्या प्रादेशिक प्रभावाला आव्हान मिळेल आणि पाकिस्तानलाही गंभीर धोरणात्मक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. दरम्यान, भारतानेही अद्याप तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नसली तरी, दोन्ही देशांमधील संबंध दिवसेंदिवस चांगले होत आहेत.

पाकिस्तानसाठी मोठा धक्का
रशियाचा निर्णय पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वैर सर्वश्रृत आहे. तालिबान अधिक मजबूत झाला, तर पाकिस्तानचा प्रादेशिक प्रभाव कमकुवत होऊ शकतो. कारण, आता अफगाण सरकार रशियाच्या माध्यमातून उर्वरित जगाशी थेट संबंध निर्माण करू शकते.
 

 

Web Title: Russia's masterstroke! Official Recognizes Taliban Government: Pakistan and US in tense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.