महाभयंकर प्लेग पुन्हा येणार? 'ब्लॅक डेथ'चे रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:53 AM2021-10-18T08:53:37+5:302021-10-18T08:53:59+5:30

जग कोरोनाने ग्रस्त असतानाच आता ‘ब्लॅक डेथ’या नव्या आपत्तीची नांदी झाली आहे.

Russian doctor warns that Black Death is re emerging | महाभयंकर प्लेग पुन्हा येणार? 'ब्लॅक डेथ'चे रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता वाढली

महाभयंकर प्लेग पुन्हा येणार? 'ब्लॅक डेथ'चे रुग्ण आढळून येत असल्यानं चिंता वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : जग कोरोनाने ग्रस्त असतानाच आता ‘ब्लॅक डेथ’या नव्या आपत्तीची नांदी झाली आहे. बदलते हवामान आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा आजार पुन्हा डोके वर काढत असल्याचा निष्कर्ष रशियातील वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. काय आहे ब्लॅक डेथ, जाणून घेऊ या...

सद्य:स्थिती काय?
रशियासह अमेरिका आणि चीन या देशांमध्ये अलीकडच्या वर्षांत प्लेगचे काही रुग्ण आढळून आले आहे. 
प्लेगचा उद्रेक टाळण्यासाठी वेळीच हवामान बदलासंदर्भातील कृती करण्याचे आदेश युनिसेफने सर्व विकसित देशांना दिले आहेत. 
काँगो प्रजासत्ताक, मादागास्कर आणि पेरू या तीन देशांमध्ये दरवर्षी प्लेगचे रुग्ण निदर्शनास येतात. सप्टेंबर ते एप्रिल या दरम्यान हा साथरोग तिथे डोके वर काढत असतो. 

ब्लॅक डेथ आहे काय?
ब्लॅक डेथ दुसरे तिसरे काही नसून प्लेग हा जुना साथरोग आहे. 
१४व्या शतकात युरोपातील ६० टक्के मृत्यू एकट्या प्लेगमुळे झाले होते. 
तेव्हापासून युरोपीय देशांमध्ये प्लेगविषयी भीती निर्माण झाली आहे. 

प्लेगची कारणे आणि लक्षणे
जंगली उंदरांवर पोसल्या जाणाऱ्या माशांमुळे हा रोग पसरतो.
हा साथरोग असून मानवाला त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. 
प्लेगमध्ये ताप येणे, थंडी वाजणे, उलट्या होणे, डोकेदुखी आणि अंगदुखी इत्यादी लक्षणे आढळून येतात.

प्लेगचा इतिहास
प्लेग हा जुना आजार असून जगभरात या आजाराने कोट्यवधींचे बळी घेतले आहेत. 
भारतातही ब्रिटिश कार्यकाळात प्लेगचा फैलाव झाला होता.

प्लेगचे निदान झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. 
अद्याप प्लेगवर परिणामकारक लस निर्माण झालेली नाही. खबरदारी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. 

Web Title: Russian doctor warns that Black Death is re emerging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app