शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

"युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याचा बदला घेणार रशिया, सध्या...!"; ट्रम्प-पुतिन यांच्यात १ तास १५ मिनिटे फोनवर चर्चा, काय-काय बोलले दोन्ही नेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:05 IST

ट्रम्प म्हणाले, पुतिन यांनी रशियावरील ड्रोन हल्ल्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, आपण याचे उत्तर देणार असे म्हटल आहे. हा हल्ल्याला 'ऑपरेशन स्पायडरवेब' असे नाव देण्यात आले होते. याअंतर्गत युक्रेनने रशियाच्या चार एअरबेसना लक्ष्य केले होते. 

युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केल्यानंतर, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन स्वस्थ बसणार नाहीत, हे निश्चित होते. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवरून दीर्घ चर्चा झाली. यावेळी, आपण युक्रेनच्या हल्ल्याचे कठोर प्रत्युत्तर देणार, असे स्पष्ट संकेत पुतिन यांनी दिले आहेत. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, आपण बुधवारी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत सुमारे १ तास १५ मिनिटे फोनवर चर्चा केली. ही चर्चा युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर झाली. महत्वाचे म्हणजे, "चर्चा चांगली झाली, मात्र तत्काळ शांतता येणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

हल्ल्याचं उत्तर देणार... - 
ट्रम्प म्हणाले, पुतिन यांनी रशियावरील ड्रोन हल्ल्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, आपण याचे उत्तर देणार असे म्हटल आहे. हा हल्ल्याला 'ऑपरेशन स्पायडरवेब' असे नाव देण्यात आले होते. याअंतर्गत युक्रेनने रशियाच्या चार एअरबेसना लक्ष्य केले होते. 

इराण अणु करारावर चर्चा - 
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले, दोन्ही नेत्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरही चर्चा केली. पुतिन म्हणाले, आपण या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेत मदत करू शकतो. मात्र इराण जाणूनबुजून निर्णयास विलंब करत आहे. आता लवकरात लवकर स्पष्ट उत्तर देण्याची आवश्यकता आहे.

दोन आठवड्यांतील दुसरी चर्चा -
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील ही दुसरी चर्चा आहे. यापूर्वी १९ मे रोजी दोन्ही नेत्यांनी फोनवरच चर्चा केली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये शांततेचे प्रयत्न सुरू असले तरी युद्ध थांबण्याची खात्रीशीर आशा नाही. ट्रम्प यांनी पुतिन यांच्या अलीकडील काही कृतींवर नाराजी व्यक्त केली होती आणि म्हटले होते की, "ते पूर्णपणे वेडे झाले आहे." यापूर्वी ट्रम्प यांनी पुतिन यांना युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यावरून इशारा दिला होता तसेच "पुतिन आगीशी खेळत आहेत," असे म्हटले होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, युक्रेनियन ड्रोन हल्ल्यात ४१ रशियन बॉम्बर विमाने नष्ट झाली आहेत. याशिवाय, क्रिमिया ब्रिजलाही लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला रशियाने अत्यंत गांभीर्याने घेतला असून निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे.
 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पEnglandइंग्लंडAmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया