रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 23:00 IST2025-04-19T23:00:37+5:302025-04-19T23:00:59+5:30

Russia Ukraine War: गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच युद्धविराम जाहीर झाला आहे.

Russia Ukraine War: Russia-Ukraine war stopped; Three-day ceasefire declared, Putin announces | रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी (19 एप्रिल 2025) युद्धविरामाची घोषणा केली आहे. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. ईस्टरच्या निमित्ताने पुतिन यांनी यांनी ही घोषणा केली आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या सशस्त्र दलांचे प्रमुख जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याकडून युद्ध परिस्थितीचा अहवाल घेतला आणि रशियन वेळेनुसार 19 एप्रिल रात्री 12:00 ते 21 एप्रिल दरम्यान सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे आदेश दिले.

मानवतावादी दृष्टिकोनातून युद्धबंदी जाहीर
व्लादिमीर पुतिन यांनी ईस्टरच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी कारणास्तव युद्धबंदीची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की युक्रेनकडूनही युद्धबंदीची पावले उचलली जातील. आम्ही सैनिकांना कोणत्याही संभाव्य धोक्याबद्दल इशाराही दिला आहे. जर शत्रूने युद्धबंदीचे उल्लंघन केले, तर आमचे सैनिक योग्य उत्तर देतील, असेही पुतिन म्हणाले.

Web Title: Russia Ukraine War: Russia-Ukraine war stopped; Three-day ceasefire declared, Putin announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.