शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 21:35 IST

ताजिकिस्तानची राजधानी दुशाम्बे येथे आयोजित परिषदेत पुतीन यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडले.

तालिबाननेअफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर, काही देश तालिबानसोबत चांगले संबंध ठेवण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. चीन आणि पाकिस्ताननंतर, आता रशियानेही तालिबानशी सकारात्मक संबंधांच्या दिशेने पाऊल टाकले आहे. रशियाला तालिबानसोबत काम करावे लागेल, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीत त्यांनी हे भाष्य केले. मात्र, महत्वाची गोष्ट म्हणजे, बहुतांश देशांनी अद्यापही तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. (Russia needs to support taliban and international communities too says vladimir putin)

ताजिकिस्तानची राजधानी दुशाम्बे येथे आयोजित परिषदेत पुतीन यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडले. पुतीन म्हणाले, रशियाने अफगाणिस्तानमुद्द्यावर संयुक्त राष्ट्र परिषदेतच पाठिंबा दिला आहे. याशिवाय, जगातील प्रभावशाली देशांनीही अफगाणिस्तानातील परिस्थिती स्थिर करण्यावर विचार करावा हवा. महत्वाचे म्हणजे, चीननंतर रशियानेही तालिबानला उघडपणे समर्थन दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितले तालिबानी संकटाचे धोके; अफगाणिस्तान मुद्द्यावर केलं थेट भाष्य

अशी आहे भारताची भूमिका - शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) - कलेक्टिव सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन (सीएसटीओ)च्या आउटरीच शिखर सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात 4 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, पहिला मुद्दा असा, की अफगाणिस्तानातील शासन बदल सर्वसमावेशक नाही आणि ते कुठल्याही संवादाशिवाय झालेले आहे. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानात अस्थिरता आणि कट्टरतावाद कायम राहिला, तर जगभरात दहशतवादी आणि अतिरेकी विचारधारेला उत्तेजन मिळेल. इतर अतिरेकी गटांना हिंसाचाराच्या माध्यमाने सत्ता मिळविण्याचे प्रोत्साहनही मिळू शकते. 

याच बरोबर, अफगाणिस्तानमध्ये ड्रग्ज, अवैध शस्त्रे आणि मानवी तस्करीचे प्रमाण वाढू शकते. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रे राहिली आहेत. यामुळे, संपूर्ण प्रदेशातच अस्थिरतेचा धोका राहील. भयंकर मानवी संकट हा चौथा सर्वात मोठा मुद्दा, असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान