शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

रोहिंग्यांची नायिका, वंगबंधूकन्येला शांततेचे नोबेल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 5:11 PM

शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेशात 5 लाखांहून अधिक स्थलांतरितांना 25 ऑगस्टपासून आश्रय दिला आहे. त्याआधीही लाखो रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देरोहिंग्या आणि अल्पसंख्यांकाविरोधात म्यानमारमधील राखिन प्रांतामध्ये तणाव निर्माण झालेला असताना लाखो आश्रितांना मदत देण्यासाठी पुढे आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांन शांततेचे नोबेल देण्याची मागणी केली जात आहे. शेख हसिना आणि आंग सान सू की यांच्यामध्ये काही साम्यस्थळेही आहेत. शेख हसिना यांचे वडिल वंगबंधू मुजिबूर रेहमान हे बांगलादेशाचे संस्थापक मानले जातात तर आंग सान सू की यांचे वडील आंग सान ही म्यानमारच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले व म्यानमारचे राष्ट्रपिता मानले जा

न्यू यॉर्क, दि.4- रोहिंग्या आणि अल्पसंख्यांकाविरोधात म्यानमारमधील राखिन प्रांतामध्ये तणाव निर्माण झालेला असताना लाखो आश्रितांना मदत देण्यासाठी पुढे आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांन शांततेचे नोबेल देण्याची मागणी केली जात आहे. अमेरिका तसेच युरोपातील अनेक वृत्तपत्रे आणि नेत्यांनी या खऱ्या नायिकेला नोबेल देऊन सन्मान केला पाहिजे अशी भावना गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा व्यक्त केली आहे. शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेशात 5 लाखांहून अधिक स्थलांतरितांना 25 ऑगस्टपासून आश्रय दिला आहे. त्याआधीही लाखो रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे.

(म्यानमारमधून जीव मुठीत धरुन पळालेल्या रोहिंग्यांना बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला)

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्यानमारमधील तणावग्रस्त राखिन प्रांतामध्ये जाळपोळ, बलात्कार आणि हत्येचे सत्र सुरु झाले. रोहिंग्यांना राखिन प्रांतामधून हाकलण्यासाठी पद्धतशीर प्रयत्नही केले जात आहेत. या दंगलींना घाबरुन रोहिंग्यांनी नेफ नदी ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला. लाखो लोकांनी नो मॅन्स लॅंडमध्येही आश्रय घेतला आहे. आधीच गरिबीने आणि लोकसंख्येचा भार वागवणाऱ्या बांगलादेशाने या रोहिंग्यांना आश्रय दिला. संयुक्त राष्ट्राच्या मदतीने अन्न, औषधे, तात्पुरता निवारा, स्वच्छता या सोयीही रोहिंग्यांना पुरविण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेमध्ये शेख हसिना वाजेद यांनी मोठा वाटा उचलला होता.

शेख हसिना गेल्या महिन्यामध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी अमेरिकेत गेल्या तेव्हा त्यांची काही क्षणांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाली. ट्रम्प यांच्याकडे तुम्ही मदतीचा हात का मागितला नाहीत असे त्यांना पत्रकारांनी विचारताच त्या म्हणाल्या होत्या,' मी का त्यांच्याकडे मदत मागावी, त्यांची स्थलांतरीतांबाबतची भूमिका आम्हा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याकडे मदत मागण्याची कल्पनाही मी केली नाही' शेख हसिना यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचे प्रसारमाध्यमांनी कौतुक केले होते. ज्या म्यानमारमध्ये जाळपोळ आणि हत्येचे सत्र सुरु आहे त्या देशामध्ये लोकशाहीसाठी लढणाऱ्या आंग सान सू की या स्टेट कौन्सीलर या खऱ्याखुऱ्या सर्वोच्च अधिकारपदावर आहेत. अल्पसंख्यांकावर होणारे अत्याचार त्या थांबवतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती, मात्र दुर्दैवाने अशी कोणतीही ठाम भूमिका घेतली नाही. इतकेच नव्हे तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला त्यांनी म्यानमारची बाजू मांडणेही पसंत केले नाही. आंग सान सू की यांनी रोहिंग्यांसाठी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्याचे सांगत त्यांचा 'फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ द ऑक्सफर्ड' हा सन्मान मागे घेण्यात आला आहे. तर शेख हसिना यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत केलेल्या भाषणात म्यानमारने रोहिंग्यांना अभय देऊन पुन्हा राखिन प्रांतात परत घ्यावे अशी मागणी केली. म्यानमारने रोहिंग्याच्या परतीच्या मार्गामध्ये भूसुरुंग पेरल्याबद्दल त्यांनी निषेधही केला. शेख हसिना यांनी या भाषणाच्यावेळेस 1971 साली बांगलादेश म्हणजे तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील लोकांच्या, विचारवंतांच्या, लेखकांच्या हत्या केल्याबद्दल पाकिस्तानच्या लष्कराचाही तीव्र भाषेत उल्लेख केला. वाजेद यांच्या या भाषणाचेही सर्वत्र कौतुक झाले होते.

रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही - अाँग सान सू की

रखाइनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच , मोदी यांचे निवेदन : आँग सान सू की यांनी मानले आभार

शेख हसिना आणि आंग सान सू की यांच्यामध्ये काही साम्यस्थळेही आहेत. शेख हसिना यांचे वडिल वंगबंधू मुजिबूर रेहमान हे बांगलादेशाचे संस्थापक मानले जातात तर आंग सान सू की यांचे वडील आंग सान ही म्यानमारच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले व म्यानमारचे राष्ट्रपिता मानले जातात. मुजिबूर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारल्यानंतर शेख हसिना यांनी भारतात आश्रय घेतला होता. तर आंग सान सू की यांनीही नवी दिल्लीमध्ये शिक्षण घेतले आहे. 

रोहिंग्यांवर टीकाही होते...

शेख हसिना वाजेद यांनी रोहिंग्यांना आश्रय दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत असले तरी रोहिंग्यांनीही म्यानमारमध्ये अशांतता माजवली असा आरोप म्यानमारमधील नेते वारंवार करत आले आहेत. तसेच रोहिंग्या हे नेहमीच म्यानमारविरोधी कृत्ये करतात असे तेथील राजकीय, लष्करी व धार्मिक नेत्यांचे म्हणणे आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या तणावाच्या सत्राची सुरुवात रोहिंग्यांनीच केली असे म्यानमार लष्कराचे म्हणणे आहे.