रखाइनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच , मोदी यांचे निवेदन : आँग सान सू की यांनी मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:02 AM2017-09-07T01:02:14+5:302017-09-07T01:02:38+5:30

म्यानमारच्या रखीन राज्यातील ‘दहशतवाद्यांचा हिंसाचार’ काळजी करण्यासारखा असल्याची म्यानमारची चिंता योग्य असल्याचे भारताने बुधवारी म्हटले.

Myanmar's concern about violence in safeguarding, Modi's statement: Aung San Suu Kyi believed in gratitude | रखाइनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच , मोदी यांचे निवेदन : आँग सान सू की यांनी मानले आभार

रखाइनमधील हिंसाचाराबाबत म्यानमारची चिंता योग्यच , मोदी यांचे निवेदन : आँग सान सू की यांनी मानले आभार

Next

नै पि ता : म्यानमारच्या रखीन राज्यातील ‘दहशतवाद्यांचा हिंसाचार’ काळजी करण्यासारखा असल्याची म्यानमारची चिंता योग्य असल्याचे भारताने बुधवारी म्हटले. म्यानमारचे ऐक्य आणि भौगोलिक एकात्मता अबाधित ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या प्रमुख आँग सान सू की यांच्याशी येथे बोलताना केले.
मोदी यांचा हा पहिलाच म्यानमार दौरा आहे. मोदी व सू की यांच्यात चर्चा झाल्यानंतर, मोदी यांनी संयुक्त वृत्तपत्र निवेदनात म्यानमारला ज्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, ते प्रश्न आम्हाला काळजीचे वाटत असल्याचे म्हटले.
सू की यांनी म्यानमारने नुकतेच ज्या दहशतवादाला तोंड दिले, त्याबद्दल भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल आभार मानले. रखीन राज्यात गेल्या महिन्यात रोहिंग्या दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला करून, १२ सुरक्षा कर्मचाºयांना ठार मारले होते. की म्हणाल्या की,‘‘भारत आणि म्यानमारने एकत्रितपणे अशी काळजी घेतली पाहिजे की, आपापल्या देशात किंवा शेजारच्या देशात दहशतवाद मुळे धरणार नाही.’’

Web Title: Myanmar's concern about violence in safeguarding, Modi's statement: Aung San Suu Kyi believed in gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.