1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 07:47 PM2017-09-22T19:47:05+5:302017-09-22T19:47:35+5:30

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर निशाना साधला. त्या म्हणाल्या 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला.

In 1971, the Pakistani army killed three million innocent people | 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला

1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला

Next

जिनीवा, दि. 22 - बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर निशाना साधला. त्या म्हणाल्या 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना त्या म्हणाल्या की, नुकतेच देशातील संसदेनं 1971च्या युद्धामध्ये मृत्यू पावलेल्यानां श्रद्धांजली वाहून 25 मार्च हा नरसंहार दिवस म्हणून घोषित केला आहे.   

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 25 मार्च 1971 च्या रात्री पाकिस्तानच्या सैन्यांनी आमच्यावर अचानक हल्ला केला. तेव्हापासून युद्धाला सुरुवात झाली. 16 डिसेंबरला हे युद्ध संपले. 9 महिने चाललेल्या या युद्धामध्ये 30 लाख लोकांचा बळी गेला. तर 20000 पेक्षा आधिक महिलांच लैगिंक शोषण करण्यात आले. 1971 च्या  मुक्ती संग्रामात आम्ही नरसंहारचे भयानक रुप पाहिले. 25 मार्च 1971मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं सुरु केलेल्या जघन्य ऑपरेशन सर्चलाइटनं  नरसंहारला सुरुवात केली. 

पुढे बोलताना हसीना म्हणाल्या की. दहशतवाद आणि हिंसा घातक आहे. यामुळे विकास करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाला पोसण आणि त्यांना हत्यारे पोहचवणे तेवढच घातक आहे. या सर्वांना आळा बसला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून याच्या विरोधात लढा दिला पाहिजे असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना म्हणाल्या. 

पाकिस्तान नव्हे टेररिस्तान, संयुक्त राष्ट्रांत भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर
संयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं आहे. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे. याआधी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला. 

Web Title: In 1971, the Pakistani army killed three million innocent people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.