पाकिस्तान नव्हे टेररिस्तान, संयुक्त राष्ट्रांत भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:17 AM2017-09-22T10:17:30+5:302017-09-22T12:57:30+5:30

संयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं आहे. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे.

India does not want lecture on democracy and human rights from a failed country like yours. | पाकिस्तान नव्हे टेररिस्तान, संयुक्त राष्ट्रांत भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर

पाकिस्तान नव्हे टेररिस्तान, संयुक्त राष्ट्रांत भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर

Next
ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला'ज्या देशाने ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरसारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला, तो देश स्वत:ला पीडित म्हणवण्याचं धाडस करत आहे'

जिनीवा, दि. 22 - संयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं आहे. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे. याआधी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला. 


भारताकडून राजदूत एनम गंभीर यांनी मोर्चा सांभाळला. त्या बोलल्या आहेत की, 'टेररिस्तान बनलेल्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद फैलावत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचा प्रभाव पडत आहे. पाकिस्तानची पवित्र जमीन मिळवण्याच्या नादात पाकिस्तान दहशतवादाची पवित्र जमीन झाली आहे. आपल्या छोट्याश्या इतिहासात पाकिस्तान दहशतवादासाठी पर्याय ठरला आहे'. यापुढे बोलताना एनम गंभीर यांना पाकिस्तानला सुनावलं की, 'ज्या देशाने ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरसारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला, तो देश स्वत:ला पीडित म्हणवण्याचं धाडस करत आहे'.


काश्मीर मुद्यावर बोलतानाही एनम गंभीर यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. 'जम्मू काश्मीर नेहमी भारताचा अविभाज्य घटक असेल हे पाकिस्तानने लक्षात ठेवलं पाहिजे. पाकिस्तानने दहशतवादाला कितीही खतपाणी घातलं, तरी भारताच्या अखंडतेला धक्का लावण्यात त्यांना यश मिळणार नाही', असं एनम गंभीर बोलल्या आहेत. 


पाकिस्ताच्या जमिनीवर दहशतवाद्यांना मिळणा-या आश्रयावर बोलताना एनम गंभीर बोलल्या की, 'ज्या पाकिस्तानात दहशतवादी बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरताना दिसतात, त्यांना आम्ही भारताच्या मानवाधिकारावर सल्ला देताना आम्ही पाहिलं आहे'. पुढे बोलताना एनम गंभीर यांनी सांगितलं की, 'देशाला लोकशाही आणि मानवाधिकारावर अशा देशाकडून शिकवण घेण्याची गरज नाही, ज्याला अपयशी देश म्हणून ओळखलं जातं'.

कोण आहेत एनम गंभीर ?
एनम यांनी ट्विटरवर आपण भारतीय राजदूत असून दिल्लीमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे. फेसबूकवर त्यांनी आपण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ जिनीवामधून शिक्षण पुर्ण केलं आहे. सध्या त्या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या 2005 बॅचमधील आयएफएसच्या (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) अधिकारी आहेत.
 

Web Title: India does not want lecture on democracy and human rights from a failed country like yours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.