शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्वातंत्र्य आयोगास सरकारने व्हिसा नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 02:52 IST

भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर चर्चा करून त्याबाबत अहवाल तयार करण्यासाठी भारत दौऱ्यावर येणाऱ्या अमेरिकन आयोगाला भारत सरकारने व्हिसा नाकारला आहे.

वॉशिंग्टन : भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर चर्चा करून त्याबाबत अहवाल तयार करण्यासाठी भारत दौऱ्यावर येणाऱ्या अमेरिकन आयोगाला भारत सरकारने व्हिसा नाकारला आहे. अमेरिकन आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे (यूएससीआयआरएफ) तीन सदस्यीय शिष्टमंडळ भारतातील शासकीय अधिकारी, धार्मिक नेते व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी भारत दौऱ्यावर जाऊ इच्छित होते. एक आठवड्याचा हा प्रस्तावित दौरा शुक्रवारपासून सुरू होणार होता; मात्र तो आता रद्द झाला आहे. भारत सरकारने व्हिसा नाकारल्यामुळे आम्ही अत्यंत निराश झालो आहोत, असे यूएससीआयआरएफचे अध्यक्ष रॉबर्ट पी. जॉर्ज यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘भारत हा वैविध्याने नटलेला धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे. अमेरिकेचा निकटचा सहकारी असल्यामुळे त्याने आम्हाला दौऱ्याची अनुमती द्यायला हवी होती. यूएससीआयआरएफच्या सदस्यांना भारताकडून व्हिसा न दिला जाण्याची ही पहिली वेळ नाही. जगभरातील देशांत धार्मिक स्वातंत्र्यावर वार्षिक अहवाल तयार करणाऱ्या सदस्यांना यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळातही व्हिसा नाकारण्यात आला होता.(वृत्तसंस्था)जॉर्ज म्हणाले की, यूएससीआयआरएफने अनेक देशांचा दौरा केला असून, त्यात धार्मिक स्वातंत्र्याचे सर्वाधिक उल्लंघन होत असलेल्या पाकिस्तान, सौदी अरेबिया, व्हिएतनाम, चीन आणि म्यानमारसारख्या देशांचाही समावेश आहे. भारत सरकार या देशांच्या तुलनेत अधिक पारदर्शकता उपलब्ध करून देईल व आपले विचार थेट यूएससीआयआरएफपर्यंत पोहोचविण्याच्या संधीचे स्वागत करील, अशी आशा आहे. ‘यूएससीआयआरएफ’चे शिष्टमंडळ शुक्रवारी रवाना होणार होते आणि या दौऱ्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाचा पाठिंबा होता. यूएससीआयआरएफच्या मुख्य जबाबदाऱ्यांत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीचा आढावा घेणे आणि त्याबाबत राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेसला धोरणात्मक शिफारशी करणे याचा समावेश आहे. २०१४ नंतर भारतात धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती खराब झाल्याची वृत्ते धार्मिक संघटना, मानवाधिकार संघटना आणि स्वयंसेवी संघटनांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर यूएससीआयआरएफ भारताला भेट देण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असे जॉर्ज म्हणाले. यूएससीआयआरएफ अमेरिकन केंद्रीय सरकारचा एक स्वतंत्र, द्विपक्षीय आयोग असून या आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष आणि काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांचे नेते करतात.