शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

'कोविडसारखी परिस्थिती पुन्हा येईल!'; पुतिन यांनी रशियन उद्योजकांना केले सावध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:50 IST

Putin on Iran War 2026 : व्लादिमीर पुतिन यांचा इशारा: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम कोविड महामारीसारखाच असेल. जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा संकट गडद होण्याची भीती.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्कोमध्ये उद्योजकांशी संवाद साधताना मध्यपूर्वेतील युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. "या युद्धाचे परिणाम किती खोलवर होतील, हे सांगणे सध्या कठीण आहे, मात्र काही अंदाजांनुसार याचा जागतिक परिणाम कोविड महामारीसारखाच असेल," असे पुतिन यांनी म्हटले आहे.

पुतिन यांच्या मते, ज्याप्रमाणे कोरोनाने सर्व खंडांमधील विकास ठप्प केला होता, तसेच हे युद्ध आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक, उत्पादन आणि पुरवठा साखळी उद्ध्वस्त करत आहे. या युद्धामुळे हायड्रोकार्बन (तेल-गॅस), धातू आणि विशेषतः खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर प्रचंड दबाव आला आहे. यामुळे भविष्यात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

पुतिन यांनी रशियन तेल कंपन्यांना इशारा दिला आहे की, सध्या कच्च्या तेलाचे दर वाढल्याने होणारा नफा हा तात्पुरता असू शकतो. त्यामुळे 'विंडफॉल प्रॉफिट' (अनपेक्षित नफा) पाहून सरकारी बजेटमध्ये मोठी वाढ करणे किंवा लाभांश उधळणे धोकादायक ठरू शकते.

आर्थिक 'पॅरालिसिस'ची भीती
रशियन तज्ज्ञांच्या मते, जर 'होरमुझची सामुद्रधुनी' दीर्घकाळ बंद राहिली, तर जागतिक अर्थव्यवस्थेला अर्धांगवायू होऊ शकतो, कारण आशिया आणि युरोपचा मोठा व्यापार याच मार्गावर अवलंबून आहे.

रशियाची भूमिका
एकीकडे पुतिन शांततेचे आवाहन करत असले, तरी रशियाची इंधन कमाई वाढली आहे. रशिया सध्या दिवसाला सुमारे ७६० दशलक्ष डॉलर्स तेल आणि गॅस विक्रीतून कमवत आहे. दरम्यान, पुतिन यांनी इराणच्या नेत्यांना 'नवरोज'च्या शुभेच्छा देत रशिया हा इराणचा 'विश्वासू मित्र' असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin Warns of COVID-like Crisis Due to Middle East Conflict

Web Summary : Putin cautions that the Middle East conflict could trigger a global crisis mirroring the COVID pandemic. He highlighted potential disruptions to logistics, supply chains, and commodity markets, urging Russian companies to avoid reckless spending despite rising oil prices. A prolonged closure of the Strait of Hormuz could paralyze the global economy.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धrussiaरशिया