शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या सोबतीनं चीनला मोठा झटका देणार; बनवणार असा प्लॅन, ड्रॅगनला मिरची लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 02:30 IST

भारत आणि अमेरिका अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. यांपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC)....

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार (१२ फेब्रुवारी २०२५) पासून दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करेल. पंतप्रधान त्यांच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. यावेळी, दोन्ही नेते संरक्षण सहकार्य तसेच चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी प्रभावासंदर्भातही चर्चा करतील.

IMEC संदर्भात होईल प्लॅनिंग -भारत आणि अमेरिका अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. यांपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (IMEC). आयएमईसी हा केवळ एक व्यापार मार्ग नाही तर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (बीआरआय) काउंटर करण्यासाठी तयार केलेली रणनीती आहे. आयएमईसीच्या माध्यमातून भारताच्या तंत्रज्ञान आणि रासायनिक क्षमतेत वाढ होईल.

सागरी मार्गावरील चीनचा प्रभाव कमी करण्याची तयारी -आयएमईसीच्या माध्यमाने ४५०० किमी लांबीचा कॉरिडॉर तयार होईल. जो भारताला मध्य पूर्वेद्वारे युरोपशी जोडेल. आयएमईसी ग्लोबल सप्लाई चेन मजबूत करेल आणि व्यापार मार्गांवरील चीनच्या नियंत्रणाचे धोके दूर करेल. सध्या, चीन मलक्का सामुद्रधुनी, होर्मुझ सामुद्रधुनी आणि बाब अल-मंदाब सारख्या सागरी मार्गांसारख्या अनेक महत्त्वाच्या जलमार्गांवर आपला प्रभाव वेगाने वाढवत आहे.

अदानी समूह ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो. ही कंपनी इस्रायलच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करत आहे. अदानी समूहाने हायफा बंदरात टर्मिनल बांधण्यासाठी गुंतवणूक केली आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या हायफा बंदरात अदानी समूहाचा ७० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. यामुळे केवळ भारत-इस्रायल संबंधच मजबूत होणार नाहीत तर भारताला भूमध्य समुद्रात पाय रोवण्याची संधी देखील मिळेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन