इसिसच्या जिहादींसाठी पेड मधुचंद्र

By Admin | Updated: May 28, 2015 23:52 IST2015-05-28T23:52:00+5:302015-05-28T23:52:00+5:30

इसिसच्या ताब्यातील प्रदेशात किंवा खलिफाच्या राजधानीत म्हणजेच रक्का येथे जिहादींसाठी मधुचंद्राची सोय करण्यात आली आहे.

Pedd Madhuchandra for the Jihadis of Isis | इसिसच्या जिहादींसाठी पेड मधुचंद्र

इसिसच्या जिहादींसाठी पेड मधुचंद्र

बैरूत : इसिस वा इस्लामिक संघटना जिहादींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे शोधत असून, नव्या फंड्यानुसार इसिसच्या ताब्यातील प्रदेशात किंवा खलिफाच्या राजधानीत म्हणजेच रक्का येथे जिहादींसाठी मधुचंद्राची सोय करण्यात आली आहे. सिरियातील लढाऊ जिहादी अबू बिलाल अल होम्सी याचे ट्युनिशियातील मुलीशी आॅनलाईन चॅटिंग सुरू होते.
नुकताच त्यांचा विवाह झाला असून, रक्काच्या उपाहारगृहात मांसाहारी जेवण, त्यानंतर युफ्रेटस नदीच्या काठी केलेला विहार व आइस्क्रीम खात मारलेल्या गप्पा, असे त्याचे जीवन आहे. यासाठी लागणारे पैसे इसिसने त्याला दिलेल्या १,५०० डॉलर्सच्या भेटीतून खर्च झाले आहेत. विवाहानंतर होम्सी व त्याच्या पत्नीसाठी रोख डॉलरच्या भेटी, घर सजविण्यासाठी मदत व सर्वांत अखेरीस मधुचंद्र! विवाहानंतर कोणालाही यापेक्षा अधिक काय हवे असते? असे अल होम्सी म्हणतो.
इसिसचे साम्राज्य गेल्या १८ महिन्यांपासून चालू असून , रक्का ही त्यांची राजधानी आहे. आतापर्यंत शिरच्छेद, हत्याकांडे, अनैतिक संबंधासाठी दगडाने ठेचून मारणे, अशा शिक्षा येथे दिल्या जात असत.
येथील प्रत्येक चेकनाक्यावर सशस्त्र रक्षक उभे असून, ये-जा करणाऱ्या लोकांवर त्यांचे लक्ष असते. कोणी शरीयाचे उल्लंघन करीत आहे का? याचा वास त्यांना बरोबर येतो. या रक्षकांपैकी अनेकांच्या घरात इराकमधून अपहरण केलेल्या याझदी वंशाच्या मुली व महिला असून, त्यांना गुलाम म्हणून ठेवण्यात आले आहे. इसिस गट अत्याचारासाठी प्रसिद्ध आहे. (वृत्तसंस्था)



जिहादींचे जीवन सावरण्यासाठी कल्याणकारी योजना आखण्यात आल्या आहेत. अरब देश, मध्य आशिया व अमेरिकेतून आलेले युवक व युवती यांच्यासाठी वेगळे जीवन आखण्यात आले आहे. येथे फक्त युद्ध नाही, नागरी जीवनही आहे; पण त्याचे नियंत्रण इसिसकडे आहे.
येथे स्थलांतरित झालेल्या युवकांना विवाह करण्यासाठी मदत केली जाते. होम्सी याने स्काईपवरून अनेक टप्प्यांत ही मुलाखत दिली असून, त्यातून इसिसमध्ये सामील झालेल्या युवकांच्या वैयक्तिक आयुष्याचे दर्शन घडते.

Web Title: Pedd Madhuchandra for the Jihadis of Isis