शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पॅरीसमध्ये फ्रेंच मासिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला , १२ ठार

By admin | Updated: January 7, 2015 19:13 IST

फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकाच्या कार्यालयावर इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

ऑनलाइन लोकमत 
पॅरीस, दि. ७ - फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकाच्या कार्यालयावर इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. चार्ली हेब्दो या मासिकामध्ये २०११ मध्ये पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याने वाद निर्माण झाला होता. याचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला झाला असावा असे समजते. या घटनेचे चित्रीकरण बाजुच्या इमारतीतल्या काहीजणांनी केले तर काहीजणांनी दहशतवाद्यांना बंदुका घेऊन इमारतीत जाताना बघितले. त्यांच्या सांगण्यानुसार पैगबरांच्या वादग्रस्त कार्टूनचा बदला घेण्यात आल्याचे तसेच आम्ही अल कायदाचे असल्याचे म्हटल्याचे वृत्त आहे.
चार्ली हेब्दो हे उपहासात्मक मासिक असून या मासिकाचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. बुधवारी दुपारी अज्ञात बंदुकधा-यांनी कार्यालयावर हल्ला करत अंधाधूंद गोळीबार केला. यामध्ये सुमारे १२ जण ठार झाले आहेत. तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० पत्रकार आणि २ पोलिसांचा समावेश आहे. हल्ल्याचे वृत्त समजताच पॅरिस पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. पोलिसांनी कार्यालयातील सुमारे ४० जणांची सुखरुप सुटका केली आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हल्लेखोरांकडे एके  ४७ आणि रॉकेट लॉंचर असल्याचे समजते. २ ते ३ दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समोर येत असून स्थानिकांची कार चोरुन त्यांनी पॅरीसहून बाहेर जाणा-या मार्गाच्या दिशेने पलायन केले. हल्ला केल्यावर दहशतवाद्यांनी 'पैगंबराच्या विरोधात जाणा-यांचा बदला घेतला' अशी घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.  दरम्यान, हल्ल्याचे वृत्त समजताच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे.
प्रसारमाध्यमांना व महत्त्वाच्या राजकीय कार्यालयांना जास्त सुरक्षा पुरवण्यात देण्यात येत असून देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत आहे.