कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 10:46 PM2020-07-24T22:46:18+5:302020-07-24T22:47:14+5:30

इस्लामिक देशामध्ये गैर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांसाठी सरकारनी दान देता येणार नाही. इस्लाम मानणारा कोणताही मुसलमान कोणत्या दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानांसाठी दान देऊ शकत नाही, असे नाईक म्हणाला आहे.

Pakistan's money for the Krishna Temple is haraam : Zakir Naik | कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला

कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला

googlenewsNext

क्वालालंपूर : भारतात हिंसात्मक वक्तव्ये करून मलेशियाला फरार झालेला वादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईकने पुन्हा एकदा धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य़ केले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये कृष्ण मंदिर बांधण्याचा सरकारी प्रस्ताव हराम असल्याचे झाकीर नाईक बरळला आहे. 


इस्लामिक देशामध्ये गैर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांसाठी सरकारनी दान देता येणार नाही. इस्लाम मानणारा कोणताही मुसलमान कोणत्या दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानांसाठी दान देऊ शकत नाही, असे नाईक म्हणाला आहे. एका ऑनलाईन कार्यक्रमात झाकीर नाईक हे बोलला आहे. इस्लामाबादमध्ये सरकार आपल्या पैशाने गैर इस्लामिक स्थळांना पैसे दऊ शकत नाही. कोणाला आर्थिक मदत करू शकत नाही. या मुद्यावर सर्व विद्वानांचे एकच मत आहे. याआधीही अशाप्रकारचे फतवे जारी करण्यात आले आहेत, असे झाकीर नाईक म्हणाला. 


झाकीरने इस्लामी नियमांचा हवाला देत म्हटले की, जर कोणताही मुस्लिम देश चर्च किंवा मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देत असेल तर त्याला हराम मानले जाणार आहे. मुस्लिम देशांत जर परकीय व्यक्तीला चर्च किंवा मंदिर बनविण्याची परवानगी नसेल तर मुस्लिमांच्या कराचा पैसा मंदिरासाठी वापरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नाईक म्हणाला.


इम्रान खान सरकारने हिंदूंना लुभावण्यासाठी मंदिराचा प्रस्ताव दिला होता. मात्र, कट्टरपंथियांकडून विरोध होऊ लागल्याने त्यांच्या फतव्यांपुढे गुडघे टेकत या मंदिराच्या बांधकामावर बंदी आणली आहे. हे पाकिस्तानातील पहिले हिंदू मंदिर असणार होते. आता पाकिस्तान सरकार इस्लामिक आयडियॉलॉजी काऊंन्सिलचा सल्ला घेणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

दुचाकीस्वारांनो! केंद्राने नियम बदलले; अपघात टाळण्यासाठी नवा आदेश

लॉकडाऊनने एसटीचे आर्थिक गणित बिघडवले; स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

Web Title: Pakistan's money for the Krishna Temple is haraam : Zakir Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.