Pakistan Imran Khan : राजकीय संकटात सापडलेल्या इम्रान खान यांनी खेळले ३ ट्रम्प कार्ड; अशी केली संसद बरखास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 10:07 PM2022-04-03T22:07:40+5:302022-04-03T22:08:00+5:30

Pakistan Imran Khan :विरोधकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे त्यांच्यावर टांगती तलवार होतीच.

pakistan pm imran khan surrounded political crisis played 3 trump cards national assembly dissolved pakistan news now elections will be held | Pakistan Imran Khan : राजकीय संकटात सापडलेल्या इम्रान खान यांनी खेळले ३ ट्रम्प कार्ड; अशी केली संसद बरखास्त

Pakistan Imran Khan : राजकीय संकटात सापडलेल्या इम्रान खान यांनी खेळले ३ ट्रम्प कार्ड; अशी केली संसद बरखास्त

googlenewsNext

Pakistan Imran Khan : विरोधकांनी पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे त्यांच्यावर टांगती तलवार होतीच. विरोधक इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असताना नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान आलेच नाहीत. यादरम्यान, उपसभापती कासिम सूरी यांनी पंतप्रधान इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर इम्रान खान देशाला संबोधित करण्यासाठी टीव्हीवर आले आणि त्यांनी राष्ट्रपतींकडे नॅशनल असेंब्ली बरखास्त करून देशात पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी शिफारस केली. इम्रान खान यांच्या शिफारसीनंतर अर्ध्या तासातच राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केली. त्यामुळे पाकिस्तान आता निवडणुकीच्या दिशेने पुढे चालला आहे.

दरम्यान, आता पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान असलेल्या इम्रान खान यांनी तीन ट्रम्प कार्ड खेळली. तसंच विरोधकांना आता या ठिकाणी काय होईल याची माहितीही नाही. त्यांनी खेळलेलं पहिलं ट्रम्प कार्ड म्हणजे यात त्यांनी ज्यामध्ये त्याने विदेशी षडयंत्राला शस्त्र बनवलं. दुसरं ट्रम्प कार्ड म्हणजे मतदान न करता अविश्वास ठराव फेटाळला आणि तिसरे ट्रम्प कार्ड म्हणजे त्यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली.

इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्ताव हे परदेशातील षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेतील पाकिस्तानच्या राजदूतानंही हेच वक्तव्य केलं. दुसरीकडे, रविवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार होते. पण सरकार स्थापन करण्यासाठी १७२ च्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचणं इम्रान खान यांच्यासाठी सोपं नव्हतं, दरम्यान अविश्वास प्रस्ताव मतदानाशिवाय फेटाळला गेला.

इम्रान खान यांची इनिंग संपुष्टात
अशाप्रकारे पाकिस्तानमध्ये गेले अनेक आठवडे सुरू असलेला राजकीय गोंधळ आता काही दिवस थांबण्याच्या मार्गावर आहे. आता पाकिस्तान पुन्हा एकदा निवडणुकीच्या दिशेनं जात आहे. इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले नसले तरी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांची इनिंग संपुष्टात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

Web Title: pakistan pm imran khan surrounded political crisis played 3 trump cards national assembly dissolved pakistan news now elections will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.