Pakistan Plane Crash 3 crore recovered pia crash plane in pakistan SSS | धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ

धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ

इस्लामाबाद - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी (22 मे) भीषण अपघात झाला होता. लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले होते. याबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात तब्बल तीन कोटी रुपये सापडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्याखाली विविध देशांच्या चलनी नोटा सापडल्या आहेत. या चलनी नोटांची किंमत ही जवळपास तीन कोटी रुपये आहे. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशी सापडली, सुरक्षा व तपासणी यंत्रणेने तपास केला नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 47 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून 43 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Pakistan Plane Crash : 'आगीचे लोट, असंख्य किंकाळ्या अन्...', दुर्घटनेतून बचावलेल्या 'त्याने' सांगितलं नेमकं काय घडलं?

भीषण विमान अपघातातून मोहम्मद झुबेर थोडक्यात बचावले. त्यांनी या अपघाताचा भयावह अनुभव सांगितला. विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना कोसळले अशी माहिती या दुर्घटनेतून बचावलेल्या मोहम्मद झुबेर यांनी दिली. 'डोळे उघडले चारही बाजुंना आगीचे लोट दिसत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य होते. काहीही दिसत नव्हतं फक्त लोकांच्या सर्व बाजूंनी किंकाळया ऐकू येत होत्या' असा भयावह अनुभव मोहम्मद यांनी सांगितला आहे. तसेच 'वैमानिकाने प्रवाशांना लँडिंग करणार असल्याचं सांगितले. त्यानंतर धावपट्टीच्या दिशेने उतरत असताना विमान कोसळले. मी माझा सीट बेल्ट काढला त्यानंतर मला प्रकाश दिसला. मी त्या दिशेने गेलो. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मी 10 फूटावरुन उडी मारली' असं देखील मोहम्मद यांनी सांगितलं होतं. 

विमान अपघातातून मोहम्मद झुबेर आणि पाकिस्तानील बँक ऑफ पंजाबचे प्रमुख झफर मसूद बचावले आहेत. बँक ऑफ पंजाबचे सीईओ झफर मसूद यांना फक्त फ्रॅक्चर झाले आहे. विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. लाहोरहून कराचीला जाणारे हे विमान पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआईए) होते. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आता समोर आली. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

चार्जिंगचं नो टेन्शन! आता उन्हात चार्ज होणार फोन; 'या' कंपनीने आणली दमदार पॉवर बँक

CoronaVirus News : लढ्याला यश! जगातली सर्वात जलद, स्वस्त टेस्ट किट तयार, फक्त 1 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार?

CoronaVirus News : बापरे! लस तयार झाली तरी कोरोना पाठ सोडणार नाही; तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pakistan Plane Crash 3 crore recovered pia crash plane in pakistan SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.