CoronaVirus Marathi News dhanvantri rath successful tool against corona SSS | CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात नवा प्रयोग; 'या' शहरात सुरू झाले 'धन्वंतरी रथ'

अहमदाबाद - देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल दीड लाखांवर गेला आहे. 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून यानंतर आता गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी विविध नवनवीन प्रयोग केले जात आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी गुजरात सरकारने एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. अहमदाबादमध्ये 'धन्वंतरी रथ' सुरू करण्यात आले आहेत. 'धन्वंतरी रथ' ही व्हॅन असून ते एक चालतं फिरतं रुग्णालय असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर आणि तपासण्यासाठी आवश्यक ते सामान आणि औषधांचा साठा असणार आहे.

अहमदाबादच्या रस्त्यावर हे धन्वंतरी रथ दिसणार आहेत. यामध्ये रुग्णांची, नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. अहमदाबाद मेट्रो कॉर्पोरेशनच्या 14 कंटमेंट झोनमध्ये अशा पद्धतीचे धन्वंतरी रथ सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. या व्हॅनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा रुग्णाचं थर्मल स्कॅनिंग केलं जाणार आहे. रुग्णाची तपासणी आणि पॅरामेडिकल स्टाफ रुग्णाला मधुमेह आहे की नाही याची तपासणी करेल. त्यानंतर आरोग्यासंबंधित काही प्रश्न विचारले जातील. तसेच रुग्णाला पुढची ट्रिटमेंट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एका दिवशी एक रथ हा चार ठिकाणी जातो. तेथील लोकांना आवश्यक असलेली आरोग्य विषयक मदत करण्यात येत आहे. सुरुवातील 50 धन्वंतरी रथ सुरू करण्यात आले होते. मात्र आता त्याची संख्या वाढवून 84 करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला आरोग्यविषयक काही त्रास असेल तर तो या सेवेचा लगेचच लाभ घेऊ शकतो. अहमदाबादमध्ये धन्वंतरी रथच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकांना फायदा झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी

CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती

CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला

CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News dhanvantri rath successful tool against corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.