Imran Khan: इम्रान खानना मोदींशी पंगा घ्यायचाय; व्यक्त केली टीव्हीवर भिडायची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 08:28 PM2022-02-22T20:28:43+5:302022-02-22T20:36:53+5:30

Imran Khan TV Debate with Narendra Modi: इम्रान खान २३ फेब्रुवारीला रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. दोन दशकांत पहिल्यांदाच पाकिस्तानी नेता रशियाच्या दौऱ्यावर जात आहे.

Pakistan: Imran Khan wants to tv debate with PM Narendra Modi; want to talk on Kashmir issue, interview before Russia visit | Imran Khan: इम्रान खानना मोदींशी पंगा घ्यायचाय; व्यक्त केली टीव्हीवर भिडायची इच्छा

Imran Khan: इम्रान खानना मोदींशी पंगा घ्यायचाय; व्यक्त केली टीव्हीवर भिडायची इच्छा

Next

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाच्या दौऱ्यावर काय चाललेत त्यांना स्त्फुरनच चढले आहे. एक दोनदा नाही तर तीनदा भारताशी युद्ध हरले तरी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घ्यायचा आहे. सर्जिकल स्ट्राईकने तर पाकिस्तानचा बुरखाच फाडला. तरीही इम्रान खान यांना मोदींशी टीव्हीवर भिडायची इच्छा आहे. 

रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी इम्रान खान यांनी रशियन टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीवी डिबेटचा प्रस्ताव दिला आहे. मंगळवारी इम्रान खान यांनी हा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशां दरम्यान असलेले मतभेद सोडविण्यासाठी त्यांना नरेंद्र मोदींसमवेत एक टीव्ही डिबेटमध्ये चर्चा करण्यास आवडेल असे ते म्हणाले. त्यांनी Russia Today ला मुलाखत दिली. जर हा प्रश्न सुटला तर भारत आणि पाकिस्तानच्या अब्जावधी लोकांसाठी फायद्याचे ठरेल असे ते म्हणाले. 

मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांनी भारतावर आरोप केला की त्यांनी वाटाघाटीसाठी पुढाकार घेतला असूनही भारत सरकारने त्याला कोणतेही सकारात्मक उत्तर दिले नाही. भारत आता नाझीसारख्या अतिरेकी विचारसरणीने व्यापला आहे. 'ज्यावेळी माझा पक्ष 2018 मध्ये सत्तेत आला, तेव्हा मी भारताकडे हात पुढे केला होता. मी म्हणालो की आपण बसून काश्मीर प्रश्नावर चर्चा करू आणि हा प्रश्न सोडवू. मी भारताला चांगले समजतो. मी भारतासोबत जवळपास 10 वर्षे क्रिकेट खेळलो आहे. पण जेव्हा मी भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला, तेव्हा मला वाटले की हा मला माहीत असलेला भारत नाहीय, असे इम्रान खान म्हणाले. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने इम्रान खान यांच्या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला, परंतू त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. इम्रान खान २३ फेब्रुवारीला रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. खान यांची ही मुलाखत त्यांच्या रशिया दौऱ्याच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे. इम्रान खान रशियाच्या दौऱ्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. दोन दशकांत पहिल्यांदाच पाकिस्तानी नेता रशियाच्या दौऱ्यावर जात आहे.

Web Title: Pakistan: Imran Khan wants to tv debate with PM Narendra Modi; want to talk on Kashmir issue, interview before Russia visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.