शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Flood : भीषण! पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान, 1300 जणांचा मृत्यू; कोट्यवधी लोकांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:12 IST

Pakistan Flood : पाकिस्तानातील महापुरामुळे देशातील जवळपास 1,300 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लष्कराचे मदतकार्य सुरू आहे.

पाकिस्तानमध्ये मुसळधार पुराचा कहर सुरूच आहे. या पुरात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पाकिस्तान सरकारने जगभरातील देशांना मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, पाकिस्तानातील महापुरामुळे देशातील जवळपास 1,300 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लष्कराचे मदतकार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) शनिवारी सांगितले की, पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासांत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. जूनपासून देशातील मृतांची संख्या 1,290 वर पोहोचली आहे. 

पाकिस्तानच्या सरकारी संस्था आणि खासगी स्वयंसेवी संस्था देखील पूरग्रस्त भागात मदतीचा हात पुढे करत आहेत. देशाचा मोठा भाग पाण्याखाली आहे, विशेषत: दक्षिणेकडील बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि सिंध प्रांतांत कहर पाहायला मिळत आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, सिंधमध्ये किमान 180 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर खैबर पख्तूनख्वा (138) आणि बलुचिस्तान (125) आहेत. याशिवाय या पुरात किमान 1,468,019 घरांचे अंशत: किंवा पूर्ण नुकसान झाले आहे.

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार 

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोट्यवधी लोकांनी पुराचा फटका बसला असून आतापर्यंत एक हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानमधील अनेक भागांत आलेल्या पुराचा तब्बल 3 कोटी नागरिकांना फटका बसला. पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन दलाने याआधी दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक रस्ते, 150 पूल आणि तब्बल सात लाख घरं वाहून गेली आहेत. 

पुरामुळे निम्म्याहून अधिक देश पाण्याखाली

पाकिस्तानमधील हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुरामुळे सध्या निम्म्याहून अधिक देश पाण्याखाली आहे. मोसमी मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात लाखो नागरिक बेघर झाले. 57 लाख नागरिक बेघर झाले आहेत. पुराचा सर्वाधिक तडाखा खैबर-पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि सिंध या प्रांतांना बसला आहे. पुरात रस्ते आणि पुल वाहून गेले असल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले असून मोठय़ा प्रमाणात प्राण्यांचा बळी गेला आहे. पुराची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूर