तालिबानवर प्रहार करण्यासाठी 'ऑपरेशन गजब लिल हक'; अफगाणविरोधात पाकिस्तानने पुकारले युद्ध, केले एअर स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 06:19 IST2026-02-28T06:16:41+5:302026-02-28T06:19:36+5:30

अफगाणच्या हल्ल्यात पाकचे १२ सैनिक ठार, २७ जखमी; पाकच्या प्रतिहल्ल्यात २७० तालिबानी ठार, ४०० जखमी

'Operation Ghazab Lil Haq' to attack Taliban; Pakistan declares war against Afghanistan, conducts air strikes | तालिबानवर प्रहार करण्यासाठी 'ऑपरेशन गजब लिल हक'; अफगाणविरोधात पाकिस्तानने पुकारले युद्ध, केले एअर स्ट्राइक

तालिबानवर प्रहार करण्यासाठी 'ऑपरेशन गजब लिल हक'; अफगाणविरोधात पाकिस्तानने पुकारले युद्ध, केले एअर स्ट्राइक

इस्लामाबाद : अफगाणिस्तानपाकिस्तान-यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असून, पाकने आता युद्ध सुरू झाल्याची घोषणा केली आहे. अफगाण तालिबानकडून झालेल्या सीमापार हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या कारवाईत २७० हून अधिक तालिबानी ठार झाले, तर ४०० पेक्षा जास्त जखमी झाले, असा दावाही पाकने केला आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी दावा केला की, अफगाणने ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि पाकिस्तानातील 'महत्त्वाच्या लष्करी ठिकाणां'वर हल्ले केले. तसेच या कारवाईदरम्यान पाकिस्तानच्या १९ तपासणी चौक्या व अन्य काही ठिकाणे ताब्यात घेतल्या आहेत.

पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील २६११ किमी लांबीची सीमा 'ड्युरंड रेषा' म्हणून ओळखली जाते. अफगाणिस्तानने या सीमेला औपचारिक मान्यता दिलेली नाही. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, आता आमचा संयम संपला आहे. आता अफगाणिस्तानशी आमचे युद्ध सुरू झाले आहे. आम्ही त्या देशाचे शेजारी आहोत.

अफगाणिस्तानविषयी प्रत्येक गोष्ट आम्हाला माहीत आहे. पाकने गुरुवारी उशिरा रात्री 'ऑपरेशन गजब लिल हक' अंतर्गत अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. तालिबानची २ कॉर्ट्स मुख्यालये, ३ ब्रिगेड मुख्यालये, २ दारुगोळा कोठार, १ छावणी, ३ बटालियन मुख्यालये, २ सेक्टर मुख्यालये, ८० हून अधिक रणगाडे, तोफ, चिलखती वाहने नष्ट करण्यात आली, असा दावा पाकिस्तानने केला आहे.

देशाची अखंडता, सुरक्षा याबाबत पाकिस्तान कोणतीही तडजोड करणार नाही. कोणत्याही आक्रमणाला पाकचे लष्कर चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहे, असे पाकचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी व पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले.

पाकिस्तानची सौदी अरेबिया, तुर्कस्तानशी चर्चा

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी अफगाणिस्तानशी सुरू झालेल्या युद्धाबाबत तुर्कस्थान व सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. आमच्यावर झालेल्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले असे दार यांनी तुर्कस्थानचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान यांना सांगितले. सौदी परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहान यांच्याशीही दार यांनी परिस्थितीवर चर्चा केली.

पाकिस्तानचा शेअर बाजार ३ हजार अंकांनी कोसळला

युद्धाचा फटका पाकिस्तानच्या शेअर बाजाराला बसला. प्रमुख निर्देशांक केएसई १०० जवळपास ३ हजार अंकांनी कोसळला आहे.

अमेरिका-इराण यांच्यातील अण्वस्त्र कराराबाबतच्या वाटाघाटीत कोणतीही प्रगती न झाल्याने मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

त्याचा फटका भारतीय बाजाराला बसला. सेन्सेक्स ९६१ अंकांनी तर निफ्टी ३१७ अंकांनी कोसळला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

दोन्ही देशांनी राजनैतिक मार्गाने 3 तोडगा काढण्याचे आणि लवकरात लवकर युद्धविराम करण्याचे आवाहन चीन आणि रशियाने केले आहे.

Web Title : पाकिस्तान ने अफगानिस्तान पर युद्ध की घोषणा की, 'ऑपरेशन गज़ब लिल हक' शुरू किया।

Web Summary : सीमा पर हमलों के बाद पाकिस्तान ने युद्ध की घोषणा की, 'ऑपरेशन गज़ब लिल हक' शुरू किया, जिसमें सैकड़ों तालिबान लड़ाकों के मारे जाने की खबर है। अफगानिस्तान ने पाकिस्तानी सैनिकों को नुकसान पहुंचाने का दावा किया। बढ़ते तनाव का असर अंतरराष्ट्रीय बाजारों पर पड़ा।

Web Title : Pakistan declares war on Afghanistan, launches 'Operation Ghazab Lil Haq'.

Web Summary : Pakistan declared war after border attacks, launching 'Operation Ghazab Lil Haq', reportedly killing hundreds of Taliban fighters. Afghanistan claims inflicting casualties on Pakistani soldiers. International markets felt the impact of escalating tensions.