शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

१९४५ ते २०१७ दरम्यानच्या अणुचाचण्या; अणुसंसर्गाने जगभरात ४० लाख अकाली मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:40 IST

सध्या भारत, रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, इस्रायल आणि उ. कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत.

वॉशिंग्टन : १९४५ ते २०१७ या काळात जगभरात २,४००हून अधिक अणुचाचण्या करण्यात आल्यात. या चाचण्यांच्या परिणामामुळे कालांतराने कर्करोग आणि इतर आजारांमुळे जगात किमान ४० लाख जणांचा अकाली मृत्यू झाल्याची माहिती नॉर्वेजियन पीपल्स एड (एनपीए) या मानवतावादी संस्थेच्या नव्या अहवालात देण्यात आली आहे. सध्या भारत, रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, इस्रायल आणि उ. कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत.

फ्रेंच पॉलिनेशियातील ताहिता येथील संसद सदस्य हिनामोएउरा क्रॉस या अणुचाचण्यांचे बळी ठरल्या आहेत.  फ्रान्सने १९९६ मध्ये शेवटची अणुचाचणी केली तेव्हा क्रॉस या केवळ सात वर्षांच्या होत्या. त्यानंतर सतरा वर्षांनी त्यांना ल्युकेमियाचे निदान झाले. त्यांच्या कुटुंबात याआधीच आजी, आई, मावशी यांना थायरॉइड कॅन्सर झाला होता. अणुचाचण्यांमुळे आम्हाला हे सर्व भोगावे लागले असे त्यांचे मत एनपीएच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘अणुचाचण्यांचे परिणाम अतिशय घातक’

एनपीए संस्थेचे प्रमुख रेमंड जोहान्सन यांनी सांगितले की, भूतकाळातील अणुचाचण्या आजही लोकांचा जीव घेत आहेत. या चाचण्या बंद करा, लोकांच्या जिवाशी खेळू नका ही मागणी जोरकसपणे होण्यासाठी आम्ही हा अहवाल तयार केला आहे. अमेरिका पुन्हा अणुचाचण्या सुरू करू शकते असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सूचित केले होते. रशिया आणि चीन अणुचाचण्या करतात असा आरोप ट्रम्प यांचा होता.

‘लहान मुलांना जपणे अधिक महत्त्वाचे’

भूतकाळातील अणुचाचण्यांचा सर्वांत मोठा फटका चाचणी स्थळांच्या जवळ राहणाऱ्या समुदायांना बसला आहे. ही स्थळे आज १५ देशांत आहेत, ज्यात अनेक अण्वस्त्रधारी देशांच्या माजी वसाहतींचा समावेश आहे. अणुचाचण्यांमुळे पोटातील गर्भ, लहान मुले यांच्यावर सर्वांत विपरीत परिणाम होतो. मुली आणि महिलांमध्ये किरणोत्सर्गामुळे कर्करोग होण्याची शक्यता मुलांपेक्षा व पुरुषांत ५२% अधिक आहे असे एनपीए संस्थेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nuclear Tests (1945-2017) Caused 4 Million Premature Deaths Globally

Web Summary : Over 2,400 nuclear tests from 1945-2017 caused at least 4 million premature deaths globally due to cancer and related illnesses, according to a new report. Communities near test sites were most affected, with children and women particularly vulnerable to radiation's harmful effects.
टॅग्स :nuclear warअणुयुद्धDeathमृत्यू