शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी : ३५ जणांचा मृत्यू, ४२ जखमी

By admin | Updated: January 1, 2015 05:24 IST

जगभरात नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

ऑनलाइन लोकमत शांघाय, दि. १ - जगभरात नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. शांघाय या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने ही घटना घडल्याचे चीनच्या सरकारी वृत्तवाहिन्यांकडून सांगण्यात आले आहे. चीनची सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या माहितीनूसार, ही घटना शांघायमधील चेन्यी स्क्वेअर या ठिकाणी रात्री स्थानिय वेळेनुसार रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जमलेल्या लोकांमध्ये अचानक पळापळ सुरू झाल्यानं ही दुर्दैवी घटना घडली असून नेमके कोणत्या कारणाने ही पळापळ सुरू झाली हे अद्याप समजले नसले तरी काही जण पाण्यात पडल्याने त्यांना पाण्यातून बाहेर येण्याची पोलिसांनी विनंती करताच काही जणांनी त्या ठिकाणी पळापळ सुरू केल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. पळापळीने अनेक जण जागीच दगावले तर अनेकांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.