शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी अत्यंत चिंतित"; मोदींनी व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 10:24 IST

Narendra Modi And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच या घटनेचा निषेध केला आहे.

"माझे मित्र आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी अत्यंत चिंतित आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. मृत आणि जखमींच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. "मला पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. तो सुरक्षित आहेत हे जाणून मला आनंद झाला. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि रॅलीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे. जिल आणि मी ट्रम्प यांना सुरक्षितपणे एस्कॉर्ट केल्याबद्दल सीक्रेट सर्व्हिसचे आभारी आहोत. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. याचा निषेध करण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून संघटित झालं पाहिजे" असं बायडेन यांनी म्हटलं आहे. 

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं की, "मला पेनसिल्व्हेनियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही हे जाणून आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि या गोळीबारात जखमी झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. अशा प्रकारच्या हिंसाचाराला आपल्या देशात स्थान नाही. आपण सर्वांनी या घृणास्पद कृत्याचा निषेध केला पाहिजे आणि या घटनेमुळे आणखी हिंसाचार होणार नाही याची खात्री करण्यासाठी आपली भूमिका बजावली पाहिजे."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाFiringगोळीबार