मोदींपेक्षा माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री - त्रुदेऊ

By Admin | Updated: March 13, 2016 23:12 IST2016-03-13T23:12:39+5:302016-03-13T23:12:39+5:30

मोदी यांच्या मंत्रिमंडळाहून माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री आहेत, असे विधान केले आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी. उत्तर पश्चिम वॉशिंग्टनच्या अमेरिकी विश्वविद्यालयात

More ministers of state in my government than Modi - Trudeau | मोदींपेक्षा माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री - त्रुदेऊ

मोदींपेक्षा माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री - त्रुदेऊ

वॉशिंग्टन : मोदी यांच्या मंत्रिमंडळाहून माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री आहेत, असे विधान केले आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी. उत्तर पश्चिम वॉशिंग्टनच्या अमेरिकी विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते.
त्रुदेऊ म्हणतात की, माझ्या कॅबिनेटमध्ये मोदी यांच्या कॅबिनेटच्या तुलनेत जास्त शीख मंत्री आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर ४४ वर्षीय त्रुदेऊ यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये चार शीख नागरिकांना समाविष्ट केले होते. विश्वविद्यालयात अर्धा तास झालेल्या या चर्चासत्रात बोलताना पाकच्या पंजाब प्रांताचा विद्यार्थी जहान म्हणाला की, त्रुदेऊ यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या संख्येने पंजाबी नागरिक असणे ही कौतुकास्पद बाब आहे.

Web Title: More ministers of state in my government than Modi - Trudeau