Middle East War Updates: मध्य पूर्वेतील युद्धामुळं सौदी अरेबिया- यएई यांचा संयम सुटला; इराणविरोधात उचललं मोठं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:11 IST2026-03-24T14:07:13+5:302026-03-24T14:11:16+5:30

Middle East War Updates: आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाला आता नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे.

Middle East War Updates: Saudi Arabia Opens Airbase to U.S. and UAE Moves to Freeze Iranian Assets as Regional Tensions Escalate | Middle East War Updates: मध्य पूर्वेतील युद्धामुळं सौदी अरेबिया- यएई यांचा संयम सुटला; इराणविरोधात उचललं मोठं पाऊल!

Middle East War Updates: मध्य पूर्वेतील युद्धामुळं सौदी अरेबिया- यएई यांचा संयम सुटला; इराणविरोधात उचललं मोठं पाऊल!

आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाला आता नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यानंतर, आतापर्यंत तटस्थ राहणाऱ्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीनेइराणविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. सौदीने अमेरिकन सैन्याला आपला महत्त्वाचा हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली असून, यूएई इराणची अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता गोठवण्याच्या तयारीत आहे.

युद्धाच्या सुरुवातीपासून सावध भूमिका घेणाऱ्या सौदी अरेबियाने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. इराणकडून होणाऱ्या सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सौदीने अमेरिकन हवाई दलाला किंग फहद हवाई तळ वापरण्याची अधिकृत परवानगी दिली. या निर्णयामुळे अमेरिकेला इराणवर थेट आणि प्रभावीपणे लष्करी कारवाई करणे सोपे होणार आहे.

'वॉल स्ट्रीट जर्नल'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, केवळ लष्करीच नव्हे तर आर्थिक आघाडीवरही इराणची कोंडी केली जात आहे. संयुक्त अरब अमिराती आपल्या वित्तीय प्रणालीतील इराणची अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता गोठवण्याचा विचार करत आहे. आधीच प्रचंड महागाई आणि निर्बंधांमुळे होरपळणाऱ्या इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे इराणची युद्ध क्षमता आर्थिकदृष्ट्या कमकुवत होण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला सौदी, यूएई, कतार, कुवेत, बहरीन आणि ओमान हे देश इराणशी राजनैतिक चर्चा करून तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, इराणने थेट आखाती देशांच्या आर्थिक कणा असलेल्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू केले. यात प्रामुख्याने कतारच्या रास लाफान गॅस हबवर झालेला मोठा हल्ला निर्णायक ठरला. शिवाय, इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या होर्मुझची सामुद्रधुनी मार्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत तिथे अनधिकृत वाहतूक शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नव्हे तर, इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे या देशांच्या तेल, वायू आणि पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title : मध्य पूर्व युद्ध: हमलों के बाद सऊदी, यूएई ईरान के खिलाफ।

Web Summary : सऊदी अरब ने अमेरिकी सेना को प्रमुख हवाई अड्डे तक पहुंच की अनुमति दी। यूएई ईरानी संपत्तियों में अरबों को फ्रीज करने पर विचार कर रहा है। ऊर्जा अवसंरचना पर ईरान के हमलों ने बदलाव को प्रेरित किया।

Web Title : Middle East war: Saudi, UAE act against Iran after attacks.

Web Summary : Saudi Arabia allows US military access to key airbase. UAE considers freezing billions in Iranian assets. Iran's attacks on energy infrastructure prompted the shift.