शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमध्ये प्रचंड मतदान

By admin | Updated: May 25, 2014 23:31 IST

युक्रेनमध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीनंतर रशियाशी चाललेला संघर्ष संपेल अशी

कीव / डोनस्टेक - युक्रेनमध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीनंतर रशियाशी चाललेला संघर्ष संपेल अशी  युक्रेनची अपेक्षा आहे. युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार उसळला असून, गुरुवारी युक्रेनचे १७ सैनिक मारले गेले, तर शुक्रवारी रशियाचे दोन बंडखोर ठार झाले. रविवारी होत असलेल्या निवडणुकीनंतर सोविएत रशियातील हा माजी घटक देश पुन्हा स्थिर होईल, असे युरोप समर्थित नेत्यांना वाटत आहे. युक्रेनने रशियाचे समर्थन असणार्‍या व्हिक्टर यानुकोविच या अध्यक्षाची हकालपट्टी केल्यापासून देश अस्थिरतेच्या गर्तेत लोटला गेला आहे. रशियाने क्रिमिआ हा खनिजसमृद्ध प्रांत गिळंकृत केला असून, पूर्व युक्रेनमध्ये अस्थिरता माजविली आहे. युक्रेनने निवडणुकीदिवशी पूर्व युक्रेनमधील बंडखोराविरोधात कारवाई करणार नाही असे जाहीर केले आहे. रशियापासून युक्रेनला स्वातंत्र्य मिळून २३ वर्षे उलटली असून, प्रथमच एवढा मोठा राजकीय पेच उभा राहिला आहे. युक्रेनच्या निवडणुकीत रशियाने खोडा घातल्यास रशियाविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिका व युरोपीय देशांनी दिला आहे.