युक्रेनमध्ये प्रचंड मतदान

By Admin | Updated: May 25, 2014 23:31 IST2014-05-24T19:45:17+5:302014-05-25T23:31:30+5:30

युक्रेनमध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीनंतर रशियाशी चाललेला संघर्ष संपेल अशी

Massive voting in Ukraine | युक्रेनमध्ये प्रचंड मतदान

युक्रेनमध्ये प्रचंड मतदान

कीव / डोनस्टेक - युक्रेनमध्ये रविवारी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीनंतर रशियाशी चाललेला संघर्ष संपेल अशी  युक्रेनची अपेक्षा आहे.
युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार उसळला असून, गुरुवारी युक्रेनचे १७ सैनिक मारले गेले, तर शुक्रवारी रशियाचे दोन बंडखोर ठार झाले. रविवारी होत असलेल्या निवडणुकीनंतर सोविएत रशियातील हा माजी घटक देश पुन्हा स्थिर होईल, असे युरोप समर्थित नेत्यांना वाटत आहे. युक्रेनने रशियाचे समर्थन असणार्‍या व्हिक्टर यानुकोविच या अध्यक्षाची हकालपट्टी केल्यापासून देश अस्थिरतेच्या गर्तेत लोटला गेला आहे. रशियाने क्रिमिआ हा खनिजसमृद्ध प्रांत गिळंकृत केला असून, पूर्व युक्रेनमध्ये अस्थिरता माजविली आहे. युक्रेनने निवडणुकीदिवशी पूर्व युक्रेनमधील बंडखोराविरोधात कारवाई करणार नाही असे जाहीर केले आहे. रशियापासून युक्रेनला स्वातंत्र्य मिळून २३ वर्षे उलटली असून, प्रथमच एवढा मोठा राजकीय पेच उभा राहिला आहे.
युक्रेनच्या निवडणुकीत रशियाने खोडा घातल्यास रशियाविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिका व युरोपीय देशांनी दिला आहे.

Web Title: Massive voting in Ukraine