अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 08:11 IST2026-03-01T08:10:14+5:302026-03-01T08:11:44+5:30
इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या वाढत्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केली.

अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू
इस्रायलनेइराणवर मोठा हल्ला केला आहे. इराणच्या वाढत्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची पुष्टी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केली. इराणची सरकारी वृत्तसंस्था 'IRNA' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, दक्षिण इराणमधील होर्मोजगान प्रांतातील मिनाब शहरात असलेल्या एका मुलींच्या शाळेवर अमेरिका आणि इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या भीषण हल्ल्यात ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. अलीकडील लष्करी मोहिमेदरम्यान हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दावा केला आहे की, आज पहाटे अमेरिकेने झिओनिस्ट राजवटीसह (इस्रायल) देशातील अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. परिषदेने म्हटलं आहे की, "शत्रूला वाटतं की अशा कारवायांनी इराणची जनता दबावाखाली येईल, परंतु तसं होणार नाही."
पुढे असं म्हटलं आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांनी प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली आहे. सरकारने जनतेला आश्वस्त केलं आहे की, जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली असून घाबरण्याचं काही कारण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा आणि विद्यापीठे बंद राहतील, तर बँका सेवा सुरू ठेवतील आणि सरकारी कार्यालये सध्या ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करतील.
इस्त्रायल, अमेरिकेच्या दाव्यानंतरही इराण खामेनेई जिवंत असल्याचे सांगत होता. अखेर सरकारी न्यून चॅनलने केले जाहीर. #Khamenei#WorldWar3#Iranian#Iran#Israel#IsraelIranWar#WAr#AyatollahKhameneihttps://t.co/lSHWqjdHhM
— Lokmat (@lokmat) March 1, 2026
आम्हाला युद्ध नको होतं - इराण
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, अमेरिका आणि झिओनिस्ट राजवटीने देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन केलं आहे. त्यांनी अनेक संरक्षण प्रतिष्ठाने, पायाभूत सुविधा आणि नागरी भागांना लक्ष्य केलं आहे. मंत्रालयानुसार, लष्करी धोका असतानाही इराणने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि विविध देशांशी संवादाचा मार्ग निवडला होता, जेणेकरून तणाव टाळता येईल.
इराणी जनतेने युद्ध टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु सध्याच्या परिस्थितीत देशाचं रक्षण करणं आणि शत्रूच्या लष्करी कारवाईचा सामना करणं अनिवार्य झालं आहे. इराण चर्चेसाठी जसा तयार होता, तसाच तो कोणत्याही युद्धाला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे आणि त्यांचे सशस्त्र दल हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देतील. इराणने कधीही बाह्य आक्रमणापुढे गुडघे टेकले नाहीत आणि यावेळीही प्रत्युत्तर असं असेल की हल्लेखोरांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होईल असंही मंत्रालयाने म्हटलं आहे.
इराण-इस्रायल युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट! कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल, महागाई आणि गृहकर्ज महागणार. रुपया ९६ प्रति डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता #Iran#Crude#India#IsraelIranWarhttps://t.co/fU4dajiGPd
— Lokmat (@lokmat) March 1, 2026