शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार राहा; ट्रम्प यांची इराणला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 06:02 IST

Donald Trump Threatens Iran: इराणने अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी करार करावा, अन्यथा इराणवर बॉम्बहल्ले करू, तसेच त्या देशावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

वॉशिंग्टन - इराणने अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी करार करावा, अन्यथा इराणवर बॉम्बहल्ले करू, तसेच त्या देशावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेबरोबर कोणत्याही वाटाघाटी करण्यास इराणने गेल्या आठवड्यात स्पष्ट नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे उद्गार काढले.ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने करार केला नाही तर त्यांच्यावर अमेरिका बॉम्बहल्ले करू शकते. इराणने याआधी पाहिले नसतील असे भीषण बॉम्बहल्ले आम्ही तिथे करू. त्यांच्यावर आणखी निर्बंध लादण्याची शक्यता आहे. 

इराणवर परिणाम नाही इराणने ओमानच्या माध्यमातून ट्रम्प यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्हाला अमेरिकेशी थेट चर्चा करण्याची इच्छा नाही. अमेरिकेने टाकलेला प्रचंड दबाव, लष्करी कारवाईचा दिलेला इशारा याचा आपल्यावर काहीही परिणाम झालेला नाही, हे इराणने दाखवून दिले आहे.

अमेरिकेशी अप्रत्यक्ष चर्चा आताही सुरू - इराणइराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रविवारी सांगितले की, अमेरिकेशी आमची अप्रत्यक्ष चर्चा नेहमीच होत असते. तशी ती आताही सुरू आहे. अमेरिकेबरोबर इराणचा २०१५ साली एक करार झाला होता. त्याद्वारे इराणच्या अणुकार्यक्रमावर कठोर बंधने घालण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात इराणसोबतच्या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

‘रशियाचे तेल विकत घेणाऱ्यांवर वाढीव शुल्क’युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी खो घालण्याचे प्रयत्न केले तर रशियाकडून तेल विकत घेणाऱ्यांवर २५ ते ५० टक्के शुल्क आकारण्याचा अमेरिका विचार करत असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी हा इशारा दिला. ट्रम्प यांनी असे निर्बंघ घातले तर त्याचा फटका भारतालाही बसू शकतो. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIranइराण