शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
5
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
6
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
7
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
8
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
9
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
10
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
11
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
12
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
17
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
18
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
19
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रँकफर्टमधील कट्टेकर म्हणतात, आम्ही ठीक आहोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:30 IST

जर्मनीत चालवतात मराठी कट्टा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशनाचा आधार

राजू इनामदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘भेटणे, बसणे, गप्पा मारणे आणि संघटना स्थापन करणे’ याची जन्मत:च ओढ असणाऱ्या मराठी बांधवांनी जर्मनीतही (फ्रँकफर्ट) ही आवड जपली आहे. कोरोना विषाणूच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी कट्टा’च्या माध्यमातून तब्बल साडेचार हजार मराठी ‘जन’ फेसबुक पेजचा वापर करत परस्परांचा आधार झाले आहेत.
‘मराठी कट्टा, जर्मनी’ ही फ्रँकफर्ट आणि परिसरातल्या साडेतीन-चार हजार मराठी लोकांना अगदी आपली वाटणारी संघटना. अजित रानडे आणि त्याच्या मित्रमंडळींनी मराठी लोकांचे सांस्कृतिक कार्यक्रम करावेत, त्यांना एकत्र आणावं आणि त्यांच्यासाठी अडीअडचणीला उपयोगी पडणारा एखादा ग्रुप असावा म्हणून काही वर्षांपूर्वी हा कट्टा सुरू केला. गेली काही वर्षे जर्मनीत असलेले या कट्ट्याचे सदस्य हृषीकेश कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘‘सध्याच्या काळात अजित ने आपल्या ‘देसी जर्मन्स’ या खाजगी कंपनीची सर्व संसाधनं मराठी कट्ट्याच्या बरोबरीने मराठी / भारतीय लोकांना मदत करण्यासाठी झोकून दिली आहेत. जीवन करपे, अक्षय जोशी, मोहिनी काळे, सागर तिडमे, जान्हवी देशमुख, डॉ. मेघा जाधव, इंद्रनील पोळ अशी आणि इतरही अनेक उत्साही तरुण मंडळी त्याच्या बरोबरीने मैदानात उतरून गरजू लोकांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि मदत करीत आहेत.’’
कुलकर्णी म्हणाले, ‘‘याशिवाय आणखी काही गोष्टी इथे मराठीपणातून सुरू झाल्या आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आॅफीस सुटल्यावर (म्हणजे घरात कॉम्प्युटर बंद केल्यावर) करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या कॉन्सुलेट (फ्रँकफर्ट)च्या फेसबुक पेजवर जायचं. तिथे रोज ‘कनेक्ट लाईव्ह विथ सीजीआय’ नावाच्या कार्यक्रमात काहीतरी गंमत असतेच. कधी कोणी येऊन गोष्ट सांगतात, कधी कोणी नृत्य शिकवतात, कधी तज्ज्ञांचे सल्ले, तर कधी एखादी प्रश्नमंजूषा. भाग घ्यायला काही हजार भारतीय (आणि जर्मनसुद्धा) व्हर्चुअली एकत्र येतात. कॉन्सुल जनरल प्रतिभा पारकर यांनी सुरू केलेल्या या उपक्रमावर भारतीय एकदम खूष आहेत.’’ एकमेकांना भेटून प्रसन्न होणार नाही तो भारतीय कसला? असा प्रश्न करून कुलकर्णी म्हणाले, ‘‘कॉन्सुलेटच्या वेबसाईटवर कोरोनाबद्दल माहिती मिळतेच; परंतु या परिसरातल्या अनेक भारतीय संस्था, मंडळे, विद्यार्थी संघटना यांचीही संपर्क माहिती एकाच ठिकाणी मिळते. जर्मनीत तशी स्थिती खूपच बरी आहे. कोणी खरंच कोरोनाने आजारी पडला, तर त्याला उत्तम वैद्यकीय मदत लगेच मिळण्याची व्यवस्था आहेच. ज्यांना कोरोना झालेला नाही; परंतु इथे एकटे पडल्यामुळे भीती वाटतेय, काळजी वाटतेय, काही सुचत नाहीये, काही सल्ला हवाय, इतर काही अडचणी आहेत, असे लोक यातल्या कुठल्या ना कुठल्या संघटनेकडे हक्काने जातात.’’
कुलकर्णी म्हणाले, ‘‘लोकांना कधीकधी शंका येतात, कधीकधी स्वत:लाच कोरोना झालाय की काय, असं वाटायला लागतं. परदेशात एकटं राहणं व तेही या परिस्थितीत आव्हानात्मकच आहे. कोणाकडे आलेल्या ज्येष्ठ आईृ-वडिलांचा व्हिसा संपलेला असतो; पण विमानसेवा बंद असल्याने ते परत जाऊ शकत नसतात. कोणाच्या पाहुण्यांनी भारतातून आणलेली औषधं संपलेली असतात आणि ती इथे कशी मिळवायची ते माहीत नसतं. जॉब सीकर व्हिसावर आलेल्यांचे प्रश्न आणखी वेगळे. हातात नोकरी नसताना, ती मिळवण्यासाठी म्हणून आलेले धाडसी लोक असतात ते. त्यातले नोकरी अद्याप न मिळालेले, कोणी इंटर्नशिप करायला आलेले तर कोणी नुसतेच टूरिस्ट. या सगळ्यांच्या समोर व्हिसा संपल्यावर
इथे अडकून पडायची वेळ आलेली आहे. अशा सर्वांना धीर द्यायचा, योग्य माहिती त्यांना द्यायची, योग्य ती सरकारी आॅफिसं, मदतगार संस्थांशी त्यांना जोडून द्यायचं अशी कामं ही मराठी कट्टेकर मंडळी अतिशय उत्साहानं करीत आहेत.’’


एकूणच मराठी आणि भारतीय लोकांनी या परिस्थितीत धीर न सोडता एकमेकांना मदत करीत सकारात्मक राहायचं ठरवलं आहे, हे स्पष्ट दिसतंय. भारतातल्या आमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना, ‘आम्ही ठीक आहोत, काळजी घेतोय, तुम्हीही घेत राहा, लवकरच भेटू’ असं नक्की सांगायचंय. अन्य माध्यमांबरोबरच ‘लोकमत’च्या माध्यमातून ते सांगा येत आहे याचा आनंद आहे, असे हृषीकेश कुलकर्णी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या