तालिबानच्या मान्यतेसाठी पाकिस्तानची धडपड सुरूच; युरोपातील ‘या’ देशाने दिला स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:35 PM2021-09-27T12:35:19+5:302021-09-27T12:37:53+5:30

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन, पाठिंबा मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

italy rules out recognising a taliban government in Afghanistan after pakistan request | तालिबानच्या मान्यतेसाठी पाकिस्तानची धडपड सुरूच; युरोपातील ‘या’ देशाने दिला स्पष्ट नकार

तालिबानच्या मान्यतेसाठी पाकिस्तानची धडपड सुरूच; युरोपातील ‘या’ देशाने दिला स्पष्ट नकार

Next

रोम:तालिबाननेअफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन, पाठिंबा मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानही अनेक स्तरांवर तालिबानला मान्यता मिळावी, यासाठी आग्रह धरत आहे. अलीकडेच पाकिस्तानकडून सार्क देशांमध्ये तालिबानचा समावेश करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, सार्क देशांनी याला नकार देत बैठकच रद्द केली. यानंतरही पाकिस्तानने धडपड सुरूच ठेवली असून, आणखी एका देशाने तालिबानला मान्यता देण्याबाबत नकार दिला असून, हा पाकसाठी एक धक्का असल्याचे सांगितले जात आहे. (italy rules out recognising a taliban government in Afghanistan after pakistan request) 

UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द

याआधी सार्क बैठकीत तालिबानला सहभागी करून घेण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला बहुतांश देशांनी विरोध दर्शवला. या बैठकीला तालिबानला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली होती. यानंतर युरोपीय देशांनी तालिबानला मान्यता द्यावी, यासाठी पाकने प्रयत्न सुरू केले. मात्र, युरोपातील इटली देशाने तालिबानला मान्यता देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

तालिबानला मान्यता दिली जाऊ शकत नाही

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने सत्ता स्थापन केली असली, तरी तालिबानच्या सरकारला मान्यता दिली जाऊ शकत नाही. मात्र, मानवीय दृष्टीकोनातून अफगाणिस्तानातील जनतेकडे पाहिले पाहिजे. स्थानिकांना मदत केली पाहिजे, असे इटलीने नमूद केले. याशिवाय तालिबानने आपल्या सरकारमध्ये १७ दहशतवाद्यांना मंत्रीपद दिले आहे. यामुळे तालिबानला मान्यता देणे अशक्य आहे, असे मत इटलीचे परराष्ट्रमंत्री लुइगी डी मायओस यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिले आहे. 

“एक दिवस जागतिक स्तरावरील सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील” 

दरम्यान, तालिबानी नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी त्यांच्यात सत्तेसाठी प्रचंड संघर्ष सुरू असून, उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना ओलीस ठेवले आहे आणि पंतप्रधान व सर्वोच्च तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा सध्या बेपत्ता आहे. त्याला ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे. हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. 
 

Web Title: italy rules out recognising a taliban government in Afghanistan after pakistan request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app