“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 10:02 AM2021-09-25T10:02:47+5:302021-09-25T10:03:33+5:30

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतदवाद्यांना समर्थन देणारा देश असल्याचा उल्लेख करत इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला. 

india clears that all jammu kashmir and Ladakh were are and will always be integral part of India | “ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

Next

नवी दिल्ली: आताच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून, ते संयुक्त राष्ट्राच्या एका सभेला संबोधित करणार आहेत. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा काश्मीरबाबत भाष्य केले. याला भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आले असून, दहशतवादी ओसामा बीन लादेनला शहीद म्हणणारे जगाचे लक्ष हटवण्यासाठी जागतिक स्तरावर पाकिस्तान दुष्प्रचार करत आहे, असे भारताने सुनावले आहे. (india clears that all jammu kashmir and Ladakh were are and will always be integral part of India)

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

जागतिक स्तरावरील सर्वात महत्वाच्या मंचावरुन भारताने शनिवारी हे स्पष्ट केले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. तसेच भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतदवाद्यांना समर्थन देणारा देश असल्याचा उल्लेख करत इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला. 

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येते

भारताने पाकिस्तानवर टीका करताना दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे. आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचे प्रयत्न झालेले पाहिले. जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणे स्वीकार करण्याची गोष्ट नाही, या शब्दांत भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा रेकॉर्डेड संदेशाचा व्हिडिओ संयुक्त राष्ट्राच्या या आमसभेत दाखवण्यात आला. यात इम्रान खान यांनी १३ वेळा काश्मीरचा उल्लेख केला आहे. तसेच हुर्रियत नेते सैय्यद अली शाह गिलानी यांच्या पार्थिवासंदर्भात खोटा प्रचारही इम्रान यांनी आपल्या व्हिडिओतून करण्याचा प्रयत्न केला.
 

Web Title: india clears that all jammu kashmir and Ladakh were are and will always be integral part of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.